शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 3:50 AM

लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे.

- समीर परांजपेलोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे. मात्र पश्चिम बंगालमधील यशामुळे या पक्षाचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला आहे. या राज्यातील ४२ पैकी १८ लोकसभा जागांवर विजय मिळवून भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला आहे. तृणमूल काँग्रेसला ४३.२८ टक्के तर भाजपला ४०.२५ टक्के मते मिळाली आहेत.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या आघाडीने लोकसभेच्या केवळ दोन जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.शिवप्रकाश पश्चिम बंगालमध्ये भाजपची संघटना बळकट करत असतानाच राजकीय आघाडी कैलाश विजयवर्गीय यांनी सांभाळली. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्याची कामगिरी त्यांनी चोखपणे बजावली. माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमधून २०१७ साली भाजपत आले ही मोठी घटना होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदार, नेत्यांसह बारा-तेरा जणांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले. ममता बॅनर्जी यांचा एककल्ली स्वभाव व कारभार याला बंगालमधील अनेक लोक कंटाळले होते. डावी आघाडी, काँग्रेस मरगळलेले असल्याने त्यांना तृणमूल काँग्रेसविरोधात एक सशक्त पर्याय हवा होता. २८ मार्च ते १ मे या कालावधीत बंगालमध्ये मोदींच्या १० तर शहांच्या ११ सभा पार पडल्या.कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रॅलीमध्ये जो हिंसाचार झाला ती उंटावरील शेवटची काडी ठरली. तृणमूल काँग्रेस व भाजपने एकमेकांवर हिंसाचार घडविल्याचे आरोप केले असले तरी मतदार वस्तुस्थिती जाणून होता. त्याने तृणमूल काँग्रेसला जिव्हारी बसेल असा फटका दिला.भाजपचे संघटन पश्चिम बंगालमध्ये मजबूत करण्याची कामगिरी त्या पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते शिवप्रकाश यांच्यावर २०१५ साली सोपविण्यात आली.पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एकेक पाऊल उचलण्यात येत होते. त्यानंतरच्या तीन वर्षांत या राज्यामध्ये भाजपच्या मंडलांची संख्या ४१५हून १२८०पर्यंत वाढविण्यात आली.उत्तर बंग, नवदीप, रार बंग, हुगळी मिदनापूर, कोलकाता अशा पाच विभागांत पक्षवाढीसाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. या कामात संघाचे स्वयंसेवक अरविंद मेनन, ओडिशाचे भाजप नेते सुरेश पुजारी यांचाही सिंहाचा वाटा होता. पण त्याचा गवगवा करणे भाजपने टाळले.>विधानसभेतहीकडवे आव्हाननिवडणुकांत मतांच्या टक्केवारीचे प्रमाण पाहिले तर पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी १६४ मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसला चांगली मते मिळाली आहेत. भाजपने १२१ विधानसभा मतदारसंघांत मतांची उत्तम बेगमी केली आहे. हे आकडे लक्षात घेता या राज्यात २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसचा भाजप हाच मुख्य प्रतिस्पर्धी असेल हे स्पष्ट होते. ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागांमध्येही भाजप व तृणमूलमध्ये कडवी लढत झाली.>मै नही मानतीसांप्रदायिकता के रंग मे मुझे नही है विश्वाससभी धर्मोमे है उग्रता, नम्रतामै हूं नम्र जागरण की एक सहिष्णू सेविकाउत्थान हुआ जिसका बंगाल मेविश्वास नही मुझे सामयिक उग्र धर्म बेचने मेमेरा विश्वास है मानवता धर्म केआलोक से आलोकित धर्म मेधर्म बेचना है जिनका ताशधर्म पहाड पर है पैसोंका वास?मै रत हूं नीज कर्मोंमेकर्महीन हो तूम सब!इसलिए बिकता है उग्रता धर्म?विश्वास है जिन्हे सहिष्णूता मेआइए जाग्रत कीजिएसमवेत सभी आइएजब वसुधैव कुटुंबकम्तो क्यो है हिसाब-किताब?उग्रता है जिसकी अभिलाषममता बॅनर्जी एक राजकारणी आहेत. तसेच त्या कवयित्री, चित्रकार आणि संगीतज्ञसुद्धा आहेत. निवडणुकांच्या निकालापूर्वी त्यांनी फेसबुकवर स्वत:चा सिंथेसायझर वाजवित असलेला व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. ‘राजनीती’ शीर्षकाची त्यांची एक कविता खूप चर्चेत होती. ‘मै नही मानती’ या त्यांच्या कवितेवर सुमारे ७ हजार लाइक्स मिळाल्या असून १ हजाराहून अधिक ‘नेटिझन्स’नी या कवितेबद्दल ‘रिट्विट’ केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Mamata Banerjeeममता बॅनर्जी