Devendra Fadnavis : "रावणाचे सहकारी कोण? जे रामललांचं अस्तित्व नाकारतात ते की मोदी?"; खर्गेंना जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 10:42 AM2022-12-02T10:42:52+5:302022-12-02T10:50:26+5:30

BJP Devendra Fadnavis And Mallikarjun Kharge : भाजपाने काँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार केला. याच दरम्यान आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खर्गे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP Devendra Fadnavis Slams Congress Mallikarjun Kharge Over PM Narendra Modi Statement | Devendra Fadnavis : "रावणाचे सहकारी कोण? जे रामललांचं अस्तित्व नाकारतात ते की मोदी?"; खर्गेंना जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : "रावणाचे सहकारी कोण? जे रामललांचं अस्तित्व नाकारतात ते की मोदी?"; खर्गेंना जोरदार प्रत्युत्तर

googlenewsNext

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदींबाबत (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आहे. खर्गे यांनी पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर मते मागितल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली आणि "तुम्हाला रावणसारखी 100 डोकी आहेत का?" असा प्रश्न केला. यानंतर भाजपानेकाँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार केला. याच दरम्यान आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी देखील खर्गे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"रावणाचे सहकारी कोण आहेत? जे रामललांचं अस्तित्व नाकारतात ते रावणाचे साथी आहेत की, अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती करणारे मोदी?" असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. तसेच "ज्यांनी प्रभू रामांच्या अस्तित्वालाच नाकारलं आणि खरंच रामाचा जन्म झाला होता का असा प्रश्न उपस्थित केला असे लोक 700 वर्षांचा कलंक मिटवून रामललांच्या मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू केलं त्यांना रावणाची उपमा देत आहेत" अशा शब्दांत टीका केली आहे. 

"रावणाचे सहकारी कोण आहेत?"

"मला विचारायचं आहे की, रावणाचे सहकारी कोण आहेत? जे रामललांचं अस्तित्व नाकारतात ते रावणाचे साथी आहेत की, अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती करणारे मोदी?" असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला. तसेच मोदींना रावण म्हणण्याचा दृष्टपणा काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला असं म्हणत यावर केवळ आम्ही नाही, तर संपूर्ण देश त्यांचा निषेध करत आहे, असंही म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून य़ाबाबत एक ट्विट केलं आहे. 

"काँग्रेसकडे नेता नाही, नीतीही नाही; पराभव दिसतो तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात"

"जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा काँग्रेसला त्यांचा पराभव खूप स्पष्टपणे दिसत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात. मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही तोड नाही, त्यापेक्षा मोठं मॉडेल आपण दाखवू शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही, असं काँग्रेस नेत्यांना लक्षात येतं तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात. काँग्रेसचे अध्यक्षांनी मोदींविषयी अपशब्द काढून हे सिद्ध केलं की काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. त्यांच्याकडे मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही उत्तर नाही. त्यांच्याकडे नेताही नाही आणि नीतीही नाही. त्यामुळेच ते अशाप्रकारच्या भाषेपर्यंत घसरले आहेत" असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BJP Devendra Fadnavis Slams Congress Mallikarjun Kharge Over PM Narendra Modi Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.