लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election 2022) राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, करहल मतदारसंघातून भाजपानेअखिलेश यादव यांच्याविरोधात एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिली आहे. एसपी सिंह बघेल हे एकेकाळी मुलायम सिंह यादव यांचे सुरक्षा अधिकारी होते. याशिवाय, ते यूपी सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.
एसपी सिंह बघेल यांची अधिकृत घोषणा भाजपाकडून करण्यात आलेली नाही, मात्र अखिलेश यादव यांनी अर्ज भरल्यानंतर एसपी सिंह बघेल हेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याचे दिसून आले. यापूर्वी अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती. यावेळी त्यांना भाजपाच्या उमेदवाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजपा या जागेवरून कोणालाही तिकीट देईल, त्या उमेदवाराचा पराभव होईल.
दरम्यान, अखिलेश यादव यांनी करहल मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, ती जागा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. करहल विधानसभेच्या जागेवर समाजवादी पार्टीचे मोठे वर्चस्व आहे. ही जागा समाजवादी पार्टीची सुरक्षित जागा असल्याचे बोलले जात आहे. 1993 पासून येथे समाजवादी पार्टी सातत्याने विजयी आहे. 2002-2007 मध्ये ही जागा भाजपाने एकदाच जिंकली होती. करहल मतदारसंघ मैनपुरी जिल्ह्यात येतो, जो यादव कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते अखिलेश यादव यांच्या विजयाचा दावा करत आहेत.
आग्रा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत एसपी सिंह बघेलकेंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अखिलेश यादव यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते मैनपुरी येथे पोहोचले होते. एसपी सिंह बघेल हे आग्रा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. करहल जागेवर एसपी सिंह बघेल यांच्या उमेदवारीची ऐतिहासिक घोषणा अद्याप झाली नसली तरी अखिलेश यादव यांच्यानंतर त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
सपाच्या तिकीटावर तीनवेळी निवडून आले होते एसपी सिंह बघेल एसपी सिंह बघेल हे इटावा येथील आहेत. एसपी सिंह बघेल हे 1998, 1999 आणि 2004 मध्ये समाजवादी पार्टीच्या तिकिटावर विजयी होऊन खासदार झाले होते. यानंतर त्यांची समाजवादी पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर एसपी सिंह बघेल यांनी 2009 आणि 2014 मध्ये बसपाकडून निवडणूक लढवली, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एसपी सिंह बघेल हे राज्यसभेचे खासदारही होते. याचबरोबर, एसपी सिंह बघेल यांनी 2015 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये एसपी सिंह बघेल भाजपाच्या तिकिटावर तुंडला येथून आमदार झाले. त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीही करण्यात आले. मात्र, 2019 मध्ये त्यांना आग्रा येथून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी ही निवडणूक जिंकली. नंतर सरकारने एसपी सिंह बघेल यांना केंद्रीय मंत्री केले.
सात टप्प्यात विधानसभा निवडणूकदरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.