शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

‘पप्पू’ शब्द वापरायला मनाई, भाजपाला निवडणूक आयोगाचे निर्देश; मानहानी करणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:25 PM

भारतीय जनता पक्षाला निवडणूक आयोगाने गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये ‘पप्पू’ शब्द वापरायला मनाई केली आहे

ठळक मुद्देआयोगाकडून पप्पू शब्द वापरायला मनाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना भाजपच्या सूत्रांनी सांगितले की जाहिरातींचे लेखन हे कोणत्याही व्यक्तिशी संबंधित नव्हते.

अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाला निवडणूक आयोगाने गुजरात राज्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांतील जाहिरातींमध्ये ‘पप्पू’ शब्द वापरायला मनाई केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी पप्पू शब्द वापरला जातो व तो मानहानीकारक आहे. समाजमाध्यमांत ‘पप्पू’ हा शब्द राहुल गांधी यांना कमी लेखण्यासाठी वापरला जातो. आयोगाकडून पप्पू शब्द वापरायला मनाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना भाजपच्या सूत्रांनी सांगितले की जाहिरातींचे लेखन हे कोणत्याही व्यक्तिशी संबंधित नव्हते. गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील प्रसारमाध्यम समितीने तिच्याकडे गेल्या महिन्यात मंजुरीसाठी सादर केलेल्या जाहिरातीतील शब्दाला आक्षेप घेतला होता, असे भाजपने म्हटले. निवडणुकीशी संबंधित कोणतीही जाहिरात करायच्या आधी आम्हाला समितीकडे प्रमाणपत्रासाठी तिचे लेखन सादर करावे लागते. तथापि, समितीने पप्पू या शब्दाला तो मानहानिकारकअसल्याचे सांगून आक्षेप घेतला. तो शब्द काढून टाकून त्याऐवजी दुसरा शब्द वापरण्यास त्यांनी आम्हाला सांगितल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. आक्षेपानुसार नवा शब्द घालून नवे लेखन निवडणूक आयोगाला सादर केले जाईल,  असे ते म्हणाले.यशवंत सिन्हांनी मोदींचीतुलना केली तुघलकाशीभाजपचे नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोटांबदीच्या निर्णयासाठी महंमद बिन तुघलकाशी तुलना केली. सिन्हा म्हणाले की, १४ व्या शतकातील दिल्लीचा राजा तुघलकानेही ७०० वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. येथे कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी मोदी यांच्या वादग्रस्त ठरलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला ३.७५ लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा केला. अनेक राजे पूर्वी होऊन गेले की ज्यांनी आपले स्वत:चे चलन आणले. काही जणांनी नवे चलन आणल्यानंतरही जुनेही कायम ठेवले. परंतु ७०० वर्षांपूर्वीच्या शहेनशाहने (तुघलक) स्वत:चे चलन आणल्यानंतर जुने चलन रद्द केले होते. तुघलकाची दिल्लीतील राजवट फारच थोडा काळ होती तरी त्याने राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Electionनिवडणूक