नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे महासचिव सी. टी. रवी यांनी जेएनयूचं नामांतर करण्याची मागणी केली आहे. जेएनयूचं नाव बदलून स्वामी विवेकानंद विद्यापीठ करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी सी. टी. रवी यांनी ट्विटद्वारे केली आहे. 'स्वामी विवेकानंद कायम भारताच्या विचारधारेसाठी ठामपणे उभे राहिले. त्यांची मूल्य भारताचं सामर्थ्य दाखवतात. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं नाव बदलून त्याला स्वामी विवेकानंदांचं नाव देणं उचित ठरेल. देशभक्त संताचं जीवन पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल,' असं मत रवी यांनी व्यक्त केलं आहे. रवी यांच्याकडे नुकतीच पक्षानं गोवा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
"जेएनयूचं नाव बदला, स्वामी विवेकानंदाचं नाव द्या; विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल"
By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 8:14 PM