नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिल्यामुळे नवे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता. यावरून तिचा आगामी चित्रपट छपाकवर बहिष्कार घालण्याची मोहीम ट्रोलर्सनी राबविली आहे. तर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने दीपिकाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
भाजपाचे नेते गोपाल भार्गव यांनी दीपिका पदुकोणवर टीका केली आहे. अभिनेत्रीने मुंबईतच राहावे आणि नाचावे असं वादग्रस्त वक्तव्य भार्गव यांनी केलं आहे. जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिका सहभागी झाली होती. दीपिकाच्या जेएनयू भेटीवरून सध्या राजकारण तापले आहे. भाजपाच्या गोपाल भार्गव यांनी 'मुंबईमध्ये थांबून अभिनेत्रीने केवळ डान्स केला पाहिले. तिला जेएनयूमध्ये जाण्याची काय गरज होती हेच मला कळलं नाही. स्वत: ला कलाकार आणि कार्यकर्ते म्हणवणारे अनेक लोक तयार झाले आहेत' असं भार्गव यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भाजपाचे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले खासदार साक्षी महाराज यांनीही एक वक्तव्य केलं होतं. दीपिका पादुकोण ही तुकडे तुकडे गँगचीच असल्याचं म्हटलं. दीपिकाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे दीपिका ट्रोलर्सच्या निशान्यावर आली होती. एवढच नाही तर सोशल मीडियावर #BoycottChhapaak अशी मोहीम दीपिकाविरुद्ध राबविण्यात आली होती. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेचं समर्थन करणाऱ्या लोकांनी दीपिकाला देशद्रोही ठरवण्यास सुरुवात केली होती. तसेच लोकांनी तिचा आगामी छपाक चित्रपट पाहू नये, असं आवाहन करण्यात येत होतं. दीपिकाला धडा शिकवण्यासाठी तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाका, असं आवाहन करण्यात आले होते. अनेक युजर्सने दीपिकाला देशविरोधी म्हणत अनफॉलो केले.
भाजपाचे जे नेते दीपिकाला विरोध करून तिच्या चित्रपटावर बहिष्काराचे आवाहन करीत आहेत. त्यांच्यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल, रणदीप सूरजेवाला, पवन खेडा यांच्यासह अनेक नेत्यांनी टीका केली आहे. सूरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की 'भारताच्या आत्म्याला चिरडणे बंद करा, तुम्ही आणि भक्त कोणत्याही कलाकाराला विरोध नाही करू शकत नाहीत. 'छपाक' पदुकोणचाच चित्रपट नाही तर ज्या हजारों महिलांवर अॅसिड हल्ले झाले त्यांचाही आहे.' तसेच सिब्बल म्हणाले की, 'कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री कोणाच्या पाठिशी उभी ठाकली तर हे लोक त्याला राष्ट्रविरोधी वा देशद्रोही जाहीर करतात.'
महत्त्वाच्या बातम्या
शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार 15 हजार; आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना
बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण
गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक
हिंसाचार थांबला की मगच ‘सीएए’वर सुनावणी घेऊ; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट
पंतप्रधान मोदी यांची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, बजेटची तयारी सुरू