ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - आणीबाणी हे प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील एक काळे पान मानले जाते. आणीबाणी जाहीर करण्याच्या निर्णयामुळे कणखर आणि धाडसी निर्णयांसाठी लोकप्रिय असलेल्या इंदिरा गांधी यांच्यावर अजूनही टीका होत असते. आता आणीबाणीच्या काळातील कटू आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यासाठी 25 जूनला आणीबाणीच्या 42 व्या वर्षपूर्ती दिवशी मोदी सरकार आपल्या मंत्र्यांना देशाच्या विविध भागात पाठवणार आहे. आणीबाणीच्या कटू स्मृतींबाबत लोकांना माहिती देणे हा याचा हेतू असेल.1975 साली तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात होत असलेल्या आंदोलनांना नियंत्रणात आणण्यासाठी अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली होती. त्यानंतर आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या विरोधी पक्षामधील अनेक नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले होते.
( हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी )