शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

निवडणुकांसाठीची वयोमर्यादा भाजपाने केली शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 4:06 AM

निवडणुकांच्या राजकारणासाठी वयाच्या ७५ वर्षांची मर्यादा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिथिल केल्याने ज्येष्ठ नेत्यांनाही आता लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकणार आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - निवडणुकांच्या राजकारणासाठी वयाच्या ७५ वर्षांची मर्यादा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिथिल केल्याने ज्येष्ठ नेत्यांनाही आता लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकणार आहे. या निर्णयाचा लालकृष्ण अडवाणी (९०), मुरली मनोहर जोशी (८४), शांताकुमार (८३) व लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन (७५) यांना लाभ होऊ शकेल. सध्या लोकसभेत १७ भाजपा खासदारांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे.अमित शहा यांनी म्हटले, निवडणूक लढविण्यासाठी वयाची मर्यादा नाही. ७५ वर्षांची मर्यादा पदासाठी आहे. पदे कोणती याचा खुलासा केला नसला तरी मंत्रिपदे, लवाद, आयोग, बोर्ड या पदांसाठी हा निकष आहे. संसदीय समित्यांची पदे व सभापती इत्यादींसाठी नाही. निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पक्षाने ज्येष्ठांवर सोडला आहे.एका नेत्याने सांगितले की, काही खासदारांनी पंचाहत्तरी पूर्ण केली असली तरी ते निवडणुका जिंकत आहेत. ते तंदुरुस्त आहेत. शेजारील मतदारसंघावरही त्यांच्या प्रभावाचा परिणाम होऊ शकतो. त्यांचा पक्षाला लाभच होऊ शकतो.ते म्हणाले, ७५ वर्षांवरील नेत्यांना निवृत्त करण्यावर पक्ष एकेकाळी गंभीर होता. त्यामुळेच कलराज मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नजमा हेपतुल्ला यांनी राज्यपाल बनण्यासाठी राज्यसभा सोडली. तथापि, कलराज मिश्रा यूपीतील भाजपाचा ब्राह्मण चेहरा आहेत. शांताकुमार यांनी हिमाचलमध्ये पक्षाला जिंकण्यासाठी मदत केली. बिहारचे हुकूमदेव नारायण यादव ७८ वर्षांचे असले तरी यादवांचे नेते आहेत. सुमित्रा महाजन इंदूरमधून नऊ वेळा निवडून गेल्या आहेत, तर ७९ वर्षीय करिया मुंडा यांना झारखंडमधील आदिवासींमध्ये मान आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक