- हरीश गुप्तानवी दिल्ली : भाजपालापंजाबात निवडणुकीपूर्वीच पानिपत होण्यासारख्या स्थितीचा सामना करावा लागत आहे. जिंकून येण्याजोगे उमेदवारच येथे भाजपाला मिळेनासे झाले आहेत.पंजाबातील १३ लोकसभा मतदारसंघांपैकी अमृतसर, गुरदासपूर आणि होशियारपूर (एससी) या जागा भाजपा लढत आहे. अमृतसरमधून लढण्यास गृहनिर्माण व नगर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नकार दिला आहे. भाजपाने सिनेअभिनेते धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओल यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांनीही नकार दिला आहे. धर्मेंद हे भाजपाचे बिकानेरचे माजी खासदार आहेत, तर त्यांच्या पत्नी हेमा मालिनी मथुराच्या भाजपा खासदार आहेत. खरे म्हणजे अमृतसरमधून भाजपाने सर्वांत आधी हेमा मालिनी यांनाच प्रस्ताव दिला होता. तथापि, आपण कृष्णभक्त असल्याने मथुरा-वृंदावनची जागा सोडू शकत नाही, असे कारण देऊन त्यांनी लढण्यास नकार दिला. त्यानंतर पक्षाने हरदीपसिंग पुरी यांना प्रस्ताव दिला. माजी आयएफएस अधिकारी असलेल्या पुरी यांना भाजपात प्रवेश दिल्यानंतर थेट मंत्री करण्यात आले होते. ते अमृतसरचेच आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अरुण जेटली यांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. तथापि, जेटली पडलेच. गुरुदासपूरमध्येही भाजपाकडे उमेदवारांची वानवा आहे. येथे सध्या काँग्रेसचे सुनील जाखड खासदार आहेत. भाजपाने विनोद खन्ना यांचे पुत्र अभिनेते अक्षय खन्ना यांना ही जागा देऊ केली होती. तथापि, त्यांनी लढण्यास नकार दिला आहे.एकाचा रामराम, तिघांना तिकीट नाकारलेहरियाणातील सर्व दहा मतदारसंघात समस्यांचा डोंगर उभा असला तरी विरोधक चार गटांत विभागलेले असल्यामुळे भाजपा सर्व जागा जिंकण्याचा दावा करीत आहे. वास्तविक २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही पक्षाला राज्यात सातच जागा मिळाल्या होत्या. त्यातील एका खासदाराने भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून, तिघांना भाजपानेच तिकीट नाकारले आहे.
पंजाबमध्ये भाजपाला मिळेनात तगडे उमेदवार; तिघांना तिकीट नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 2:25 AM