शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राजीव गांधीच सामूहिक हत्याकांडाचे जनक; पोस्टरमधून भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:03 AM

राहुल गांधी यांच्या शीखविरोधी दंगलीबद्दलच्या विधानानंतर भाजपा आक्रमक

नवी दिल्ली: 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नव्हता, या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या विधानानंतर आता भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाचे प्रवक्ते यांनी तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत पोस्टर्स लावून राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला आहे. 'राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग' म्हणजेच जमावाकडून होणाऱ्या हत्याकांडाचे जनक-राजीव गांधी असा मजकूर असलेले पोस्टर्स बग्गा यांनी दिल्लीत लावले आहेत. दिल्लीच्या चौकाचौकात लावण्यात आलेल्या या पोस्टर्सचा व्हिडीओ बग्गा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मोदी सरकारच्या काळात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून अनेकदा करण्यात आला आहे. गोहत्या, गायींची वाहतूक, गोमांस अशा विविध मुद्यांवरुन जमावाकडून हत्या झाल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. यावरुन काँग्रेसनं मोदी सरकारवर वारंवार टीका केली आहे. या टीकेला आता भाजपानं आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. राजीव गांधीच मॉब लिचिंगचे जनक असल्याचे पोस्टर लावत भाजपानं काँग्रेसवर पलटवार केला आहे. 

लंडन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी शीख दंगलीबद्दल विधान केलं होतं. 1984 मध्ये झालेलं शीखविरोधी हत्याकांड अतिशय वेदनादायी होतं. कोणाही विरोधात कोणतीही हिंसा करणाऱ्यांना 100 टक्के शिक्षा व्हायला हवी. मात्र या हत्याकांडात काँग्रेसचा सहभाग नव्हता, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेल्या चर्चासत्रात बोलताना राहुल यांनी हे वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या या विधानावर भाजपा, आप आणि शिरोमणी अकाली दलानं जोरदार टीका केली होती. 

टॅग्स :1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगलRahul Gandhiराहुल गांधीRajiv Gandhiराजीव गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस