भाजपला बहुमताची आशा; पण... कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आमदारांवर आणि रेड्डी बंधूंवरही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 07:56 AM2023-05-13T07:56:36+5:302023-05-13T07:57:06+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत पुढे राहील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत.

BJP hopes for majority In Karnataka, look at the Congress MLAs and the Reddy brothers too | भाजपला बहुमताची आशा; पण... कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आमदारांवर आणि रेड्डी बंधूंवरही नजर

भाजपला बहुमताची आशा; पण... कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आमदारांवर आणि रेड्डी बंधूंवरही नजर

googlenewsNext

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत पुढे राहील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. तथापि, भाजप नेतृत्वाला मात्र पुरेसे संख्याबळ मिळण्याचा विश्वास आहे.

भाजपच्या अंतर्गत अंदाजानुसार, २०१८ मध्ये पक्षाला २२४ पैकी १०४, अशा सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने जेडीएससोबत निवडणुकीनंतर आघाडी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपद दिले. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी सरकारची साथ सोडत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि भाजपचे नेते बी.एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले.

जुलै २०२१ मध्ये येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपद देत भाजपने जोखीम पत्करली. भाजपला बहुमत मिळेल, अशी बोम्मई यांना आशा आहे; पण भाजपने आता जेडीएसशी संपर्क सुरू केला आहे. केंद्रातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्यासोबत संपर्क केल्याचे समजते, तर अन्य एक नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या संपर्कात आहेत.

भाजप मुख्यमंत्रिपद जेडीएसला देण्यास तयार आहे की नाही, हे निश्चित नाही; पण सरकार स्थापन करण्यास संख्याबळ कमी पडल्यास जेडीएसची कोणतीही मागणी भाजप पूर्ण करू शकते. 

भाजपला ९० पेक्षा कमी जागा मिळाल्यास परिस्थिती बदलू शकते. भाजपला असे वाटते की, मोठ्या संख्येने महिलांनी पक्षाला मतदान केले आहे, तर अल्पसंख्याक आणि वोक्कलिगा या समुदायाचे मतदान जेडीएसकडे गेले आहे.

यावेळी बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार नसल्याचे संकेत आहेत, तर पक्षाकडून नवीन चेहरा समोर आणला जाऊ शकतो. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, कर्नाटकात कोणीही जिंकले तरी आम्ही सरकार स्थापन करू.

Web Title: BJP hopes for majority In Karnataka, look at the Congress MLAs and the Reddy brothers too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.