शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

UP Election: डीबीटीमुळे भाजपाला मतांची आशा; राज्य, केंद्र सरकारने ५ वर्षांत वाटले ५ लाख कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 9:22 AM

राज्य, केंद्र सरकारने ५ वर्षांत वाटले ५ लाख कोटी रुपये

- शरद गुप्तानवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये लाभार्थांच्या खात्यांत केंद्र व राज्य सरकारने गेल्या ५ वर्षांत थेट पाठवलेल्या (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर-डीबीटी) ५ लाख कोटी रुपयांमुळे भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळण्याची आशा आहे. केंद्र सरकारने या रकमेपैकी ७५,९८४ कोटी रुपये तर गेल्या एका वर्षात १४६ योजनांतर्गत जन-धन खात्यांत पाठवले आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने गेल्या ५ वर्षांत २७ विभागांच्या १३७ योजनांतर्गत २.७५ लाख कोटी रुपये डीबीटी माध्यमातून लाभार्थींच्या खात्यांत पाठले आहेत.

प्रधानमंत्री किसान निधींतर्गत १.८८ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये पाठवले गेले. मनरेगांतर्गत उत्तर प्रदेशला २०१८-२०१९ मध्ये ५,४६५ कोटी रुपये, २०१९-२०२० मध्ये ६,२४० कोटी रुपये दिले. २०२०-२०२१ मध्ये १२,२५७ कोटी रुपये डीबीटीने पाठवले गेले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, उज्ज्वला योजना, प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ योजना आदींतर्गतही केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या लोकांना लाखो कोटी रुपयांची मदत केली आहे. आदित्यनाथ सरकारने गेल्या दीड वर्षापासून राज्यातील गरिबांना दरमहा प्रतिव्यक्ती १० किलो रेशन माेफत देत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२