नवी दिल्ली : लोकसभेच्या सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर शनिवार सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर आल्यानंतर रविवारी झी न्यूजने इंडिया कन्सोलिडेटेड यांच्या सहकार्याने केलेल्या देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित एक्झिट पोल जाहीर केला.
त्यानुसार भाजपप्रणीत एनडीए पुन्हा एकदा केंद्रात सत्तेत येत असून त्यांना ३०५ ते ३१५ जागा, तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला १८० ते १९५ जागा, तर इतर पक्षांना ३८ ते ५२ जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. एआय आधारित या एक्झिट पोलसाठी झी न्यूजने तब्बल १० कोटींचा सॅम्पल साईजचे सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे.
राज्यांच्या आकडेवारीत दिसतेय मोठी तफावतशनिवारी आलेल्या विविध संस्थांच्या आणि रविवारी आलेल्या एआय एक्झिट पोलमध्ये काही राज्यांच्या अंदाजात तफावत असल्याचे दिसते. एक्झिट पोल कितपत खरे ठरतील, हे मात्र निकालानंतरच कळू शकणार आहे.
एआय एक्झिट पोलएनडीए ३०५ ते ३१५ इंडिया १८० ते १९५ इतर ३८ ते ५२