CoronaVirus: पंतप्रधान मोदी अविरतपणे जनतेची सेवा करतायत, तर काँग्रेस संभ्रम पसरवतेय: जेपी नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 12:10 PM2021-05-20T12:10:51+5:302021-05-20T12:13:05+5:30
CoronaVirus: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत देशातील परिस्थितीचा आढावा घेतला.
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोनाच्या थैमानामुळे बेड्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वांना डिसेंबरपर्यंत कोरोना लस मिळेल, असे आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिले आहे. (bjp jp nadda says everyone will get corona vaccine till december)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी डिसेंबरपर्यंत सर्वांना कोरोना लस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगत काँग्रेसने लोकांमध्ये भीती निर्माण केल्याचा टीका नड्डा यांनी केली.
चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली
आतापर्यंत १८ कोटींहून अधिक भारतीयांचे लसीकरण
पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्य आणि मुख्यमंत्र्याना मार्च महिन्यातच कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीच सर्व तयारी करण्यास सांगितले होते. देशात फक्त ९ महिन्यातच दोन भारतीय लसी कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन तयार करण्यात आल्या. आतापर्यंत १८ कोटींहून अधिक देशवासीयांचे लसीकरण करण्यात आले आहे. डिसेंबरच्या शेवटी देशातील सर्व नागरिकांना लस देण्यात येईल, यासाठी वेळ निश्चित केली जात आहे, अशी माहिती नड्डा यांनी यावेळी दिली.
बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!
काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवून भीती निर्माण करतेय
‘टूल किट’मुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. कोरोनाच्या काळातही देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी अविरतपणे देशातील जनतेची सेवा करीत आहेत आणि काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवून भीती निर्माण करत आहे, असा निशाणा जेपी नड्डा यांनी साधला.
YouTube कडून महिन्याला ‘इतके’ पैसे मिळतात; नितीन गडकरींनी सांगितला कमाईचा आकडा
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७६ हजार ०७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ६९ हजार ७७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.