...तर राहुल गांधींचा खरा धर्म कळेल; भाजपा नेत्याची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 07:29 PM2019-04-16T19:29:26+5:302019-04-16T19:30:32+5:30

भारतीय जनता पार्टीच्या केरळमधील प्रदेशाध्यक्षाने काँग्रेस नेत्यांवर टीका करताना केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

BJP keral president Pillai give controversial statement on rahul gandhi | ...तर राहुल गांधींचा खरा धर्म कळेल; भाजपा नेत्याची जीभ घसरली

...तर राहुल गांधींचा खरा धर्म कळेल; भाजपा नेत्याची जीभ घसरली

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगात आहे तसे राजकीय नेत्यांच्या भाषणांची पातळी घसरली असल्याचं दिसून येतं आहे. आझम खान, मायावती, योगी आदित्यानाथ यांच्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीच्या केरळमधील प्रदेशाध्यक्षाने काँग्रेस नेत्यांवर टीका करताना केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

अट्टिंगल येथे जाहीर सभेला संबोधित करताना केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्रीधरन पिल्लई यांची जीभ घसरली आहे. पिल्लई यांनी मुस्लिमांची ओळख पटवायची असेल तर त्यांचे कपडे उतरवा अशा अश्लिल शब्दाचा वापर जाहीर सभेत केला. मुस्लिमांमधील खतना प्रथेवरुन त्यांनी हे विधान केल्याचं विरोधकांकडून आरोप केला जात आहे. श्रीधरन पिल्लई हे भाजपा उमेदवार शोभा सुरेंद्रन यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेण्यासाठी अट्टींगलला पोहचले होते. 

यावेळी श्रीधरन पिल्लई यांनी एअर स्ट्राईकवरुन संशय घेणाऱ्या नेत्यांविरोधात हे वादग्रस्त विधान केले आहे. भाषणाच्या ओघामध्ये पिल्लई म्हणाले की, राहुल गांधी, येचुरी आणि पिनारई विजयन यांनी एअर स्ट्राईकनंतर भारतीय जवानांनी किती दहशतवादी मारले असा प्रश्न उपस्थित केला. या लोकांची जाती धर्म ओळखायचा झाला तर ते मुस्लिम असतील तर त्यांच्या शरीरावर काहीतरी निशाण असतीलच. जर तुम्ही या लोकांचे कपडे उतरवले तर सर्वांना माहीत पडेल की हे लोक मुस्लिम आहेत की नाही? असं वादग्रस्त विधान त्यांनी केले.

पिल्लई यांच्या विधानावरुन केरळमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाला बळ मिळालं आहे. सीपीआयने श्रीधरन पिल्लई यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. श्रीधरन पिल्लई यांनी मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्यासाठी असं विधान केले. त्यांच्या घाणेरड्या विचारावरुन त्यांची विचारधारा कळते. निवडणूक आयोगाने पिल्लई यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसने श्रीधरन पिल्लई यांच्या वक्तव्याचा निषेध करत पिल्लई यांनी मुस्लिम समुदायाचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. जर पिल्लई यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा काँग्रेसने केला आहे. 

मात्र श्रीधरन पिल्लई यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे, मी कोणत्याही प्रकारचं वादग्रस्त विधान केले नाही. जर माझ्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तर कायदेशीर कारवाई करेन कारण मी कोणावरही अश्लिल टिप्पणी केली नसल्याचा स्पष्टीकरण श्रीधरन पिल्लई यांनी दिलंआहे.   
 

Web Title: BJP keral president Pillai give controversial statement on rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.