West Bengal Election Results 2021: बंगाल निवडणूक निकालावर अशी आली अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 09:18 PM2021-05-02T21:18:24+5:302021-05-02T21:19:18+5:30
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विविध प्रकारच्या दाव्यांनंतरही जबरदस्त विजय मिळविला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीएमसी 216 जागांवर तर भाजप 75 आघाडीवर आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगाल निवडणुकीवर गृह मंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शाह म्हणाले, आपण बंगालच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान करतो. भाजपला दिलेल्या समर्थनाबद्दल जनतेप्रती आभार व्यक्त करतो. (BJP leader Amit Shah first reaction on the west bengal election results 2021)
अमित शाह म्हणाले, भाजप एका शक्तीशाली विरोधीपक्षाच्या स्वरुपात बंगालमधील जनतेचे अधिकार आणि राज्याच्या प्रगतीसाठी नेहमीच आवाज उचलत राहील. भाजप बंगालच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
बंगाल की जनता के जनादेश का सम्मान करते हैं।
— Amit Shah (@AmitShah) May 2, 2021
भाजपा को दिए समर्थन के लिए जनता का आभार व्यक्त करता हूँ। भाजपा एक मजबूत विपक्ष के रूप में बंगाल की जनता के अधिकारों व प्रदेश की प्रगति के लिए निरंतर आवाज उठाती रहेगी।@BJP4Bengal के कार्यकर्ताओं के परिश्रम के लिए उनका अभिनंदन करता हूँ।
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विविध प्रकारच्या दाव्यांनंतरही जबरदस्त विजय मिळविला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीएमसी 216 जागांवर तर भाजप 75 आघाडीवर आहे. ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का आहे. पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद झोकून दिली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात वादळी प्रचार केला होता. मात्र, अखेर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.
ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा होणार बंगालच्या CM -
ममता बॅनर्जी आता सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. भाजपने संपूर्ण तागदीनिशी बंगाल विधानसभा निवडणूक लढली होती. भाजपने येथे आपण 200 हून अधिक जागा जिंकू, असा दावा केला होता. मात्र, त्यांना दाव्याप्रमाणे यश मिळाले नाही.
ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा -
2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.