शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बिहारच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ?; अमित शाह यांच्या एका वाक्याने वाढवला नितीश कुमारांबाबत सस्पेन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 4:27 PM

बिहारमध्ये बैठकांचा सपाटा आणि नेत्यांच्या भेटीगाठींनी राज्यातील राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत दिले आहेत.

BJP Amit Shah ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. इंडिया आघाडीला धक्का देत नितीश कुमार हे पुन्हा एनडीएसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्या एनडीएतील एंट्रीच्या चर्चेवर आपली भूमिका मांडली आहे.

अमित शाह यांनी एका वृत्तपत्राला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शाह म्हणाले की, नितीश कुमारांकडून एनडीएत सामील होण्याबाबतचा प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल. शाह यांच्या या वक्तव्यानंतर आरजेडी-जेडीयू युती तुटण्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे.

बैठकांची मालिका, बिहारमध्ये नेमकं काय घडतंय?

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांच्या निवासस्थानी भाजपच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे, नितीश कुमार यांनीही आपल्या आमदारांना पुढील सूचना मिळेपर्यंत पाटण्यात थांबण्यास सांगितलं आहे. तसंच बिहारमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या सर्व आमदारांना पाटण्यातच थांबायला सांगितलं आहे.

लालू आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

इंडिया आघाडीत फुटीची चर्चा असताना आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ खलबतं झाल्याचे समजते. मात्र ही नियमित बैठक असल्याचं तेजस्वी यादव यांनी सांगितलं असून बिहारमध्ये भाजपचा सुपडासाफ होईल, असाही दावा केला आहे.

दरम्यान, बिहारमधील सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या बैठकांचा सपाटा आणि नेत्यांच्या भेटीगाठींनी राज्यातील राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार खरंच इंडिया आघाडीची साथ सोडणार की भाजपविरोधात आपली भूमिका कायम ठेवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहार