शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

बंगालच्या रॅलीत अमित शाह यांचा 'शायराना' अंदाज; 'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 3:01 PM

आम्ही आमच्या सरकारचा हिशेब देत आहोत. ममताजी आपणही 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र त्यात, बॉम्ब स्फोट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूचे आकडे सांगून नका, असे शाह म्हणाले.

ठळक मुद्देयावेळी शाह यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना सीएए, राजकीय हिंसाचार आणि केंद्राच्या विविध योजना राज्यात लागू न केल्याच्या मुद्द्यावर घेरले. भाषणाच्या शेवटी अमित शाह यांचा शायराना अंदाजही बघायला मिळाला.ममताजी आपणही 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र त्यात, बॉम्ब स्फोट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूचे आकडे सांगून नका - शाह

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष अमित शाह यांनी बिहार आणि ओडिशानंतर आज पश्चिम बंगालला व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमाने संबोधित केले. या सर्व सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने दिल्लीतूनच होत आहेत. यावेळी शाह यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना सीएए, राजकीय हिंसाचार आणि केंद्राच्या विविध योजना राज्यात लागू न केल्याच्या मुद्द्यावर घेरले. त्यांनी ममतांना सत्तेवरून बाजुला हटवण्याचेही आवाहन केले. यावेळी, भाषणाच्या शेवटी अमित शाह यांचा शायराना अंदाजही बघायला मिळाला. त्यांनी एक कविता ऐकवत बंगालमध्ये परिवर्तनाचा विश्वास जागवला.

कालापानी-लिपुलेख मुद्द्यावर नेपाळची माघार नाही, भारताविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

पश्चिम बंगाल सरकारवर केंद्राच्या योजना लागू न करण्याचा आरोप करत आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देत, शाह म्हणाले, हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यासाठी इतरही मैदानं आहेत. आपण मैनात तयार करा, दोन-दोन हात होऊन जातील. शाह म्हणाले, बंगालमध्ये सत्ता बदलेल आणि शपथविधी होताच एकामिनिटाच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना लागू केली जाईल.

बापरे! अखेर 'तो' खजिना सापडला, कोट्यवधींचं रहस्य 10 वर्षांनंतर उलगडलं...

अमित शाह यांनी भाषणाच्या शेवटी प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांची कविता ऐकवत बंगालमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले.

शह यांनी ऐकवलेली कविता -हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए,सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए...

व्हर्च्युअल रॅलीवर अमित शाह म्हणाले, ममता बनर्जी, आपण बंगालच्या जनतेशी संवाद साधल्यापासून रोखू शकत नाही. आपण रोड आणि सभा रोखू शकता. मात्र, परिवर्तन रोखू शकत नाही. 

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

आम्ही आमच्या सरकारचा हिशेब देत आहोत. ममताजी आपणही 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र त्यात, बॉम्ब स्फोट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूचे आकडे सांगून नका, असे शाह म्हणाले.

जेव्हा सीएए कायदा संमत झाला, तेव्हा ममताजींचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. एवढा राग मी कधीच पाहिला नाही. ममताजी आपण सीएएचा विरोध करत आहात. नामशूद्र आणि मतुआ समाजापासून आपल्याला काय त्रास आहे? सीएएचा विरोध आपल्याला फार महागात पडेल. ही जनता आपल्याला राजकीय शरणार्थी बनवणार आहे, असेही शाह म्हणाले.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

पश्चिम बंगालमध्ये 2014पासून 100हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी संघर्ष करत आपला जीव गमावला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांना प्रणाम करतो. जेव्हा बंगालमध्ये परिवर्तनाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात या कार्यकर्त्यांचीही नावे लिहिली जातील, असेही मोदी म्हणाले.

 

 

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिका