नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला अजून काही अवधी आहे, मात्र राज्यातील राजकीय तापमान आतापासूनच वाढू लागले आहे. दररोज वेगवेगळ्या पक्षांचे नेते येथे काही ना काही विधाने करत आहेत, ज्याची जोरदार चर्चा रंगत आहे. आता मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी (Union Minister Pralhad Joshi) यांनी एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, कर्नाटकातील हसन येथे बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात कमी वीज दिली होती. त्याचवेळी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांना पुरेशी वीज पुरवू न शकल्याने लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली.
पंतप्रधान मोदी 12 मार्चला कर्नाटक दौऱ्यावरकर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते सातत्याने दौरे करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या निवडणूक राज्याचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मार्च रोजी कर्नाटकातील मंड्या आणि हुबळी-धारवाड या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मागील रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.
आगामी मे महिन्यापर्यंत कर्नाटकात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, "पंतप्रधान मोदी 12 मार्च रोजी मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी कर्नाटकला भेट देतील आणि त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास हुबळी येथे पोहोचतील, जिथे ते IIT धारवाडचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते जवळच्या ठिकाणी मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"