गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही मोदी सरकारवर वारंवार टीका केली होती. "राज्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता किंवा मतं जाणून न घेताच केंद्रानं कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही," असं म्हणत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे."केंद्रानं कृषी कायदे रेटले, दिल्लीत बसून शेती करता येत नाही. पण दिल्लीत कृषीमंत्री म्हणून दहा वर्षे आयपीएल सामने मात्र भरवता येतात," असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांवर निशाणा साधला.
... पण दिल्लीत बसून IPL सामने मात्र भरवता येतात, भाजप नेत्याची शरद पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 10:17 AM
Sharad Pawar : "राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही", असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला होता.
ठळक मुद्देगेल्या महिनाभरापासून सुरू आहे शेतकरी आंदोलनदिल्लीत बसून शेती करता येत नाही, असं म्हणत पवारांनी लगावला होता टोला