“केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 08:30 AM2021-09-19T08:30:21+5:302021-09-19T08:32:59+5:30

केरळचा अफगाणिस्तान होत असून, तालिबानीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे.

bjp leader claims kerala is becoming afghanistan and talibanization is happening fast | “केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा

“केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा

Next
ठळक मुद्देकेरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोयतालिबानीकरण गतीने वाढतेयकेरळमधील भाजप महासचिवांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

तिरुवनंथपूरम:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. या मोठ्या घडामोडीचे जागतिक स्तरावर मोठे पडसाद उमटत आहेत. देशातही अनेक स्तरांतून यावर प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाली. यावरून आरोप-प्रत्यारोपही झाले. यातच आता भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यांनी केरळचाअफगाणिस्तान होत असून, तालिबानीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा केला आहे. (bjp leader claims kerala is becoming afghanistan and talibanization is happening fast)

दिलासा! सलग १४ दिवस पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर; देशात सर्वाधिक भाव कुठे? पाहा, डिटेल्स

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री केजे अल्फोंज यांनी हा मोठा दावा केला आहे. केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफ नेते कट्टरतेचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करत आहेत. केरळमध्ये तालिबानसारखे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही भागांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून हे घडत आहे आणि असेच पुढेही सुरू राहिल्यास येत्या ५ ते १० वर्षांमध्ये केरळचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, असे अल्फोंज यांनी म्हटले आहे. 

भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र

केरळमधील भाजप महासचिव जॉर्ज कुरियन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून जिहादी व्यवहारांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी केली आहे. कुरियन यांच्या पत्रानंतर अल्फोंस यांनी हा दावा केला आहे. सत्तारूढ माकपाने व्यवसायिक महाविद्यालयांमध्ये तरुणांना दहशतवादाकडे नेले जात असल्याच्या प्रयत्नाबाबत इशारा दिला होता. यानंतर भाजपने या प्रकारांची केंद्रातील मोदी सरकारने नोंद घ्यावी आणि यासंदर्भात तातडीने माहिती मागवून कारवाई करावी, अशी विनंती केली होती. 

“CM उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव!”; नितेश राणेंचा अजब तर्क

दरम्यान, एका केंद्रीय मंत्र्याने यासंदर्भात केंद्र सरकारला योग्य माहिती राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्यास केंद्रीय तपास यंत्रणा एएनआयकडून याचा संपूर्ण तपास केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. 
 

Web Title: bjp leader claims kerala is becoming afghanistan and talibanization is happening fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.