चेन्नई : तामिळनाडूत १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डीएमडीके - भाजप आघाडीचा द्रमुकच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी व्यक्त केला आहे. उलट हे दोन्ही पक्ष अण्णाद्रमुकचीच मते खातील असा दावा त्यांनी केला.करुणानिधी यांनी १९५७ नंतर १२ निवडणुका जिंकल्या असून आता ते १३ व्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. करुणानिधी यांचे वय ९३ वर्षे आहे. ते म्हणाले की, यावेळी उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने निवडणुकीतील वातावरण थोडे वेगळे आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार रिंगणात आहेत. ते म्हणाले की, काही राजकीय पक्ष स्वत:ला द्रमुक किंवा अण्णाद्रमुक यांचा राजकीय पर्याय म्हणून स्वत:ला पुढे करीत आहेत. पण ते आमची मते फोडण्यात यशस्वी होणार नाहीत.
भाजपा आघाडीचा द्रमुकवर परिणाम नाही - करुणानिधी
By admin | Published: May 13, 2016 4:24 AM