नवी दिल्ली - सध्या भारतात सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवरून मोठा वाद सुरू आहे. यातच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने इंस्टाग्रामविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात, इंस्टाग्रामवर भगवान शिवशंकरांचा अपमान केला गेला, असा आरोप करण्यात आला आहे.
भाजप नेते मनीष सिंह यांनी दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रिट पोलीस ठाण्यात इंस्टाग्रामचे सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात, इंस्टाग्रामवर शिव शब्द सर्च केल्यास शिवशंकरांचा फोटो चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात येत आहे. यात भगवान शिवशंकरांच्या एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात फोन दाखविण्यात आला आहे, असे मनीष सिंह यांनी म्हटले आहे. मनीष सिंह यांनी यासंदर्भात काही फोटोही शेअर केले आहेत.
देशातील सर्वात वाईट भाषा कोणती? Googleच्या उत्तरानं उद्भवला वाद; नाराजीनंतर मागितली माफी
काही दिवसांपूर्वी गुगलवर देशातील सर्वात खराब भाषा (Ugliest language in India) असे सर्च केल्यानंतर कन्नड भाषेचे नाव येत होते. या उल्लेखानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर Google ने जाहीर माफी मागत गैरसमज आणि भावना दुखावल्यामुळे कंपनी दिलगीर आहे, असे म्हटले होते. याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक मुद्दे वादाचा विषय ठरत आहेत.