चंदीगड, दि. 7- हरियाणामध्ये भाजपाच्या नेत्याच्या मुजोरीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यांनी एका मुलीची छेड काढल्याचा प्रकरण ताज असताना भाजप नेत्याच्या मुजोरीमुळे एका रूग्णाचा जीव गेल्याची घटना घडली आहे. हरियाणातील भाजपाचे नेते दर्शन नागपाल यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. एका अॅम्ब्युलन्सचा त्यांच्या गाडीला धक्का लागल्याने त्यांनी ती अॅम्ब्युलन्स रोखून धरली. त्या अॅम्ब्युलन्समध्ये एक रूग्ण होता. अॅम्ब्युलन्स रोखल्याने त्या रूग्णाला वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. भाजपाचे नेते दर्शन नागपाल यांनी तब्बल आर्धा तास अॅम्ब्युलन्स रोखून धरली होती. या प्रकरणी दर्शन नागपाल याच्या विरोधात पीडित रूग्णाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान. या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे. भाजपा नेत्याच्या मुजोरीचं गेल्या दोन दिवसातील हे दुसरं प्रकरण आहे. द
र्शन नागपाल हे हरिणायातील फतेहाबादमधील नगरसेवक आहेत. पीडित रूग्णाच्या कुटुंबियांनी केलेले सगळे आरोप दर्शन नागपाल यांनी फेटाळून लावले आहेत. शनिवारी संध्याकाळी चंदीगडमधील फतेहबाद भागात दर्शन नागपाल यांच्या गाडीला एका अॅम्ब्युलन्सची धडक बसली. रस्त्यावर जास्त ट्राफीक असल्याने धडक बसल्याची माहिती मिळते आहे. अॅम्ब्युलन्सची धडक लागल्याने दर्शन नागपाल यांनी अॅम्ब्युलन्सला पाठलाग केला आणि नंतर अॅम्ब्युलन्सचा रस्ता रोखून धरला. आर्ध्या तास त्यांनी अॅम्ब्युलन्स पुढे जाऊ दिली नाही. असं पीडित रूग्णाचे नातेवाईक सिताराम सोनी, अरूण सोनी यांनी तक्रारीत म्हंटलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर अॅम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेथे 42 वर्षीय नवीन सोनी यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
पण पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी केलेले सगळे आरोप दर्शन नागपाल यांनी फेटाळून लावले आहेत. कारला धडक होऊनही मी अॅम्ब्युलन्सला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं होतं. त्यामुळे मी अॅम्ब्युलन्स रोखली असा प्रश्चच नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना विचारा, असं नागपाल म्हणाले आहेत. भाजपाच्या नेत्याविरूद्ध तक्रार आली असल्यातं, वरिष्ठ पोलीस अधिकारी जगदीश चंद्रा म्हणाले आहेत. तसंच दोन्हीही पक्षांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
भाजपा नेत्याच्या मुलाने काढली मुलीची छेडहरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर पाठलाग आणि छेडछाड केल्याचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे या गंभीर गुन्ह्यातही त्याला सहजरित्या जामीन मिळाला आहे. हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकासला छेडछाडीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. हरियाणामध्ये आयएएस अधिकारी विरेंदर कुंडू यांची मुलगी वर्णिकाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर विकासवर छेडछाडीचा आरोप केला आहे. तरुणीच्या आरोपानुसार, विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष कुमार एका पेट्रोल पंपापासूनच तिच्या कारचा पाठलाग करत होते आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान दाखवत पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोहोचलेल्या दोन जणांना अटक केली. यानंतर तरुणीने फेसबुकवर पोस्ट लिहिली. मी सुदैवी आहे की बलात्कारानंतर मी नाल्यात सापडले नाही,” असं तिने लिहिलं आहे.