जम्मुकाश्मिरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाली सुरू आहे. आजा देशाचे गृहमंत्री अमित शाह प्रचारासाठी जम्मू-काश्मिरमध्ये पोहोचले. यावेळी खोऱ्यातील सुरनकोटमध्ये एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी दहशतवाद आणि विरोधी पक्षांवर जबरदस्त हल्ला चढवला. खोऱ्यात 10 वर्षांनंतर विधान सभा निवडणुका होत आहेत. येथे 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यात 61% मतदान झाले.
यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवर जोरदार हल्ला चढवला. शाह म्हणाले, "काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने येते 35 वर्षे राज्य केले. दहशतवाद वाढला, 40000 लोक मारले गेले. जम्मू-काश्मीर 3000 दिवस बंद राहिले. यासाठी आपण (काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स)जबाबदार आहे." एवढेच नाही तर, आता खोऱ्यात गोळीला गोळ्याने प्रत्युत्तर दिले जाईल, असेही शाह म्हणाले.
यावेली शाह यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही विरोधकांना घेरले. शाह म्हणाले, "काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने आपल्याला आरक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवले. त्यांचे पोट अद्यापही भरलेले नाही. आरक्षणासंदर्भात आम्ही पुन्हा विचार करू, असे नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यान म्हटले आहे. उमर साहेब, आपण डोंगरी समाजाच्या आरक्षणाला हातही लावू शकत नाही. आपले (डोंगरी समाज) हितचिंतक नरेंद्र मोदी दिल्लीच्या सिंहासनावर आहेत, कुणी आरक्षणाला हातही लावू शकत नाही."
गृहमंत्री पढे म्हणाले, "भाजपने केवळ डोंगरी, गुर्जर आणि बकरवाल यांना नोकऱ्यांमध्येच नाही तर बढतीतही आरक्षण देण्याचे ठरवले आहे. हा तुमचा हक्क आहे." एवढेच नाही तर, येथील तरुणांना 'मजबूर' ठेवले गेले, आमची येथील तरुणांना 'मजबूत' करण्याची इच्छा आहे, असेही शाह म्हणाले.