झेड सुरक्षा असतानाही NSUIनं ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा रोखला, दिली बेशरमाची फुलं; मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:01 PM2021-06-12T19:01:10+5:302021-06-12T19:22:14+5:30

शिंदेंचा ताफा एअरपोर्टवर पोहोचणारच होता, तेवढ्यात गोला चौराहा येथे जवळपास 20 ते 22 लोकांनी त्यांचा ताफा रोखला...

BJP leader Jyotiraditya scindia security break nsui workers gave besharm garland and memorandum | झेड सुरक्षा असतानाही NSUIनं ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा रोखला, दिली बेशरमाची फुलं; मिळालं असं उत्तर

झेड सुरक्षा असतानाही NSUIनं ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा रोखला, दिली बेशरमाची फुलं; मिळालं असं उत्तर

Next

ग्वाल्हेर - भाजपचे राज्यसभा खासदारज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya scindia)यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले आहे. ग्वाल्हेर येथे NSUIच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा थांबवून त्यांना बेशरमाची फुलं आणि सुताची माळ दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला तेव्हा पोलीसही केवळ मूकदर्शक होऊन पाहतच राहिले. (BJP leader Jyotiraditya scindia security break nsui workers gave besharm garland and memorandum)

खरे तर, आधीच काही तरी गडबड होण्याची शक्यता होतीच. शिंदेंचा ताफा एअरपोर्टवर पोहोचणारच होता, मात्र, तेवढ्यात गोला चौराहा येथे जवळपास 20 ते 22 लोकांनी त्यांचा ताफा रोखला आणि त्यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने बेशरमाची फुलं आणि माळ दिली.

शिंदेंचे औदार्य - 
खासदारज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप कार्यकर्ते समजून आपली गाडी थांबवली होती. मात्र, निवेदन देणारे लोक NSUIचे कार्यकर्ते आहेत, हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी सुताची माळ घेतली, तथाकथित निवेदनाचा कागदही घेतला. मात्र, बेशरमाची फुलं NSUIच्या कार्यकर्त्यांना परत केली. शिंदेनी सुताची माळा आपल्या सुरक्षा रक्षकांकडे दिली. तर NSUIचे निवेदन आपल्या जवळच ठेवले आणि शिंदेचा ताफा एअरपोर्टकडे रवाना झाला. 

ज्योतिरादित्य यांना देण्यात आली आहे झेड दर्जाची सुरक्षा -
ज्योतिरादित्य यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारची सुरक्षा असलेल्या लोकांची सुरक्षा यंत्रणा सक्रिय असते आणि आधीच, अशा घटनांची माहिती मिळवते. मात्र या वेळी पोलीस फक्त बघतच होते. विशेष म्हणजे शिंदेंसोबत असा प्रकार त्यांच्याच शहरात घडला.

Jitin Prasad News: ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपाने पुन्हा काँग्रेस फोडली; उत्तर प्रदेशचा हा बडा नेता लागला गळाला

ज्योतिरादित्य शिंदे सध्या आपली छबी बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. ते छोट्या-मोठ्या सर्वच नेत्यांना भेटत आहेत. एवढेच नाही, तर त्यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयभान सिंह पवैया यांच्या घरीही ते पोहोचले होते. माजी मंत्री जयभान सिंह आणि सिंधिया कुटुंब 23 वर्षांचे कट्टर विरोधक आहेत. तरीही ते पवैया यांच्या घरी गेले होते. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. 

20 एप्रिलला पवैया यांच्या वडिलांचे नधन झाले. यामुळे ज्योतिरादित्य त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी बंद खोलीत हे नेते जवळपास 20 ते 25 मिनिटे भेटले. तेथून निघाल्यानंतर ज्योतिरादित्य म्हणाले होते, की भूतकाळ भूतकाळ असतो आणि वर्तमान-वर्तमान. 

Web Title: BJP leader Jyotiraditya scindia security break nsui workers gave besharm garland and memorandum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.