शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला, भाजपच्या 'या' बड्या नेताचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 1:07 PM

"मोदी सरकारने यूपीएकडून तयार झालेली अर्थव्यवस्थेतील गडबड आणखी वाढवली, आता अधिकांश भारतीय माझ्या बोलण्याशी सहमत..."

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवरला घरचा आहेर दिला आहे.स्वामी यांनी ट्विट केले आहे, की आता अधिकांश भारतीय माझ्या या म्हणण्याशी सहमत आहेत.यापूर्वीही स्वामींनी चीन, कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्था आदी विषयावर आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवरला घरचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी ट्विट करत, मोदी सरकार आर्थिक आघाडीवर अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकारनेही अर्थव्यवस्थेचा पार विचका केला. माझ्या या बेलण्याला अधिकांश भारतीय लोक सहमत आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. (BJP leader MP Subramanyam Swami said Narendra Modi government too has lost its economy most indians agree with me)

स्वामी यांनी ट्विट केले आहे, की आता अधिकांश भारतीय माझ्या या म्हणण्याशी सहमत आहेत, की मोदी सरकारने यूपीएकडून तयार झालेली अर्थव्यवस्थेतील गडबड आणखी वाढवली आहे. ही अर्थव्यवस्था अजूनही सुधारली जाऊ शकते. मात्र, सध्या हे कसे करायचे, हे सरकारला माहित नाही. यापूर्वीही स्वामींनी चीन, कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्था आदी विषयावर आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.

मोदी सरकारला सापडला निधी मिळवण्याचा 'महामार्ग'; तब्बल ८५ हजार कोटी उभारणार

स्वामींच्या या अर्थव्यवस्थेसंदर्भातील ट्विटवर अनेक लोकांनी कमेन्ट केल्या आहेत. उदयन मजूमदार नावाच्या एका युझरने (@yudi15) म्हटले आहे, आपल्याला अर्थमंत्री बनवायला हवे होते. मला वाटते, की या सरकारला आपल्या सारख्या विद्वानांची अॅलर्जी आहे. जे खरोखरच परिवर्तन करू शकतात. तर एका युझरने (@seas_master) म्हटले आहे, आपल्यासाठी सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे.

गडकरींबाबतचा प्रस्ताव स्वीकारला असता तर... -  तत्पूर्वी, सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, नितीन गडकरींबाबाबतचा माझा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरं झालं असतं. देशात कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढाईची सूत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हातात द्यायला हवी, असा प्रस्ताव मी दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती. पण आता देशातील कोरोनाच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाने समिती नेमली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आधी गृहमंत्रालय आदेश देत होते. आता सरकारला सुप्रीम कोर्टाचे ऐवकावे लागणार आहे. लोकशाही देशात हा एक प्रकारे सरकारचा पराभव आहे, अशी गंभीर टीका करत सुब्रमण्यन स्वामींनी केंद्र सरकारला पुन्हा घरचा आहेर दिला होता.

2 Years of Modi 2.0: कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर जनता खूश, पण मोदी सरकारच्या कृषि कायद्यांबाबत वेगळा कौल!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होतील - भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर एक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. स्वामी यांच्या दाव्यानुसार देशात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा त्यात लहान मुले, बालके (Childrens) मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतील, यासाठी आजच काळजी घ्यावी लागेल, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था