नवी दिल्ली - चीनबरोबर झालेल्या समेटावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी तर थेट राहुल गांधी यांच्या बुद्धीवरच प्रश्न उपस्थित करत पलटवार केला आहे. (BJP leader Mukhtar Abbas Naqvi targeted Rahul Gandhi comment over agreement with china)
राहुल गांधी यांनी भारत-चीन डिसएंगेजमेन्टवर दिलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे, "कुंदबुद्धी पप्पू जींच्या कमालीचा कुठलाही रस्ता नाही. दुसरीकडून सुपारी घेऊन देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आणि संरक्षण दलाचे मनोबल तोडण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. त्यावर काही उपचार नाही."
“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक, चीनसमोर झुकले; भारताच्या पवित्र जमिनीचा काही भाग ड्रॅगनच्या ताब्यात”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची जमीण चीनला का दिली? यावर गृह राज्य मंत्री किशन रेड्डी म्हणाले. 'जमीण कुणी दिली हे राहुल गांधींच्या अजोबांना विचारा. डरपोक कोण आहे, देशभक्त कोण आहे. देशतील जनतेला सर्व माहित आहे.'
"राहुल गांधी चीनचे अघोषित प्रवक्ता " -भाजप खासदार राकेश सिन्हा यांनीही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. सिन्हा म्हणाले, 'राहुल गांधींची पातळी खाली घसरत चालली आहे. जर पंतप्रधान डरपोक आहेत, तर मग जवाहरलाल नेहरू कसे होते. डरपोक कोण आहे, 1962 मध्ये नेहरूंनी 38 हजार किमी जमीन दिली होती. राहुल गांधी चीनचे अघोषित प्रवक्ते झाले आहेत. सभागृहात संरक्षण मंत्र्यांचे भाषणही व्यवस्थित ऐकत नाहीत.'
काय म्हणाले राहूल गांधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारतचीन सीमावादावरून केंद्र सरकारला टार्गेट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, त्यांनी देशाची पवित्र जमीन चीनला सोपवली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुरुवारी संरक्षणमंत्र्यांनी त्यांचे म्हणणं संसदेत मांडले, यातील काही गोष्टी साफ झाल्या पाहिजेत, एप्रिलपूर्वी परिस्थिती सर्वसामान्य होईल असं सांगितलं जात होतं, परंतु आता संरक्षण मंत्र्यानी विधान केले आहे. भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण सरकारने आता फिंगर ३ वर सहमती का दिली? पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी भारताची जमीन चीनला का दिली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.