उद्यापर्यंत थांबा, ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित होतील; निकालापूर्वी भाजप नेत्याचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 05:40 PM2023-12-02T17:40:17+5:302023-12-02T17:41:50+5:30

उद्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत.

BJP leader Narottam Mishra criticized the Congress | उद्यापर्यंत थांबा, ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित होतील; निकालापूर्वी भाजप नेत्याचा काँग्रेसला टोला

उद्यापर्यंत थांबा, ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित होतील; निकालापूर्वी भाजप नेत्याचा काँग्रेसला टोला

उद्या पाच राज्यातील विधानसभेचे निकाल समोर येणार आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटावर लढत आहे. एक्झिट पोलमध्ये दोन्ही पक्षात काटावर लढत होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आता निकालापूर्वी दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत मध्यप्रदेशचे भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 

हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक, सरकार म्हणाले, "सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार"

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत दर्शन घेण्यासाठी नरोत्तम मिश्रा शनिदेव धाम ऐंटी येथे पोहोचले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमरही उपस्थित होते. दर्शनानंतर नरोत्तम मिश्रा म्हणाले की, आज राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज त्यांची येथे ही भेट होती आणि ते दर्शनासाठी आले आहेत. जगातील सर्वात मोठा पक्ष. त्यांचा वाढदिवस सर्वांमध्ये साजरा करत आहे. 

काँग्रेसच्या एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, उद्यापर्यंत थांबा ते ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित करतील. हा काँग्रेस पक्ष आहे, ते हरले की कोणावरही प्रश्न उपस्थित करतो. ते न्यायालयावर प्रश्नचिन्ह उभे करतात, सेवेवर प्रश्न उपस्थित करतात. हे लसीवर प्रश्न उपस्थित करतात, ते एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित करतात. उद्या ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मध्यप्रदेशातील सरकार आणि मुख्यमंत्र्यांबाबत ते म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत असून पक्ष ज्यांना मुख्यमंत्रीपद देणार तेच होणार, २३० आमदारांपैकी कोणीही होऊ शकतो. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही त्याची सेमीफायनल मानली जात आहे. मध्य प्रदेश दोन्ही पक्षांसाठी महत्वाचे राज्य आहे.  मध्य प्रदेशात २३० विधानसभा जागांवर २५३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. एकीकडे भाजप सत्ता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस सत्तांतरासाठी प्रयत्न करत आहे.

Web Title: BJP leader Narottam Mishra criticized the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.