भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय बोर्डातून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना वगळण्यात आले आहे. यानंतर, त्यांच्या संदर्भात विविध प्रकारचे तर्क लावले जात आहेत. एवढेच नाही, तर विरोधी पक्षांतील काही लोक गडकरी आणि पंतप्रधान मोदी यांच्यांत मतभेज आहेत, अशा स्वरुपात ही घटना रंगवत आहेत अथवा सादर करत आहेत.
यातच आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर करत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी, ते भाजप सोडत आहेत का? असा प्रश्न केला आहे. यानंतर, स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुणाचेही नाव न घेता उत्तर देत इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या विरोधात दुष्प्रचार चालविणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासंदर्भातही भाष्य केले आहे.
नितीन गडकरी यांचे जे भाषण व्हायरल केले जात आहे आणि जे आम आदमी पक्षाच्या खासदारांनी ट्विट केले आहे, यात ते म्हणत आहेत, की त्यांना पद असल्याने आणि नसण्याने फरक पडत नाही. ते म्हणत आहेत, ''राहीले नाही, तर फरक पडत नाही, माझे पद गेले तर गेले, चिंता नाही. मी काही प्रोफेशनल राजकारणी नाही. जे होईल ते पाहिले जाईल. मी तर सामान्य नागरिक आहे. अजूनही फुटपाथवर खाणारा, थर्ड क्लासमध्ये पिक्चर बघणारा आणि मागून नाटक बघणाऱ्या लोकांमध्ये वाढलो आहे. मला तेच जीवन फार चांगले वाटते. झेड प्लस सिक्यॉरिटी अडचण होते, तेव्हा रात्री सर्वांना सोडल्यानंतर मी निघून जातो.'' या व्हिडिओमध्ये काही जर्क देखील आहेत.
गडकरींचा इशारा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी चुकीच्या संदर्भाने त्यांचे भाषण दाखवणाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ते म्हणाले, आपण कायदेशीर अॅक्शन घेण्यासही संकोच करणार नाही. एकापाठोपाठ एक ट्विट करत गडकरी म्हणाले, त्यांच्या विरोधात एक खोटी प्रचार मोहीम चालविली जात आहे. गडकरी म्हणाले, ''राजकीय फायद्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्या विरोधात नापाक आणि बनावट मोहिमेच्या माध्यमाने काही मेनस्ट्रीम मिडिया, सोशल मिडिया आणि काही लोकांकडून, एका सार्वजनिक कार्यक्रमात केली गेलेली वक्तव्य चुकीच्या संदर्भाने दाखवीली जात आहेत.''
कायदेशीर कारवाईचा इशारा - गडकरी म्हणाले, ''खरे तर, फ्रिंज एलिमेंट्सच्या अशा दुर्भावनापूर्ण अजेंड्याचा मला कधीही त्रास होत नाही. मात्र, मी या सर्व संबंधित लोकांना इशारा देतो, की जर असा खोडसाळपणा सुरूच राहिला, तर मी आपले सरकार, पक्ष आणि आमच्या लाखो मेहनती कार्यकर्त्यांच्या व्यापक हिताचा विचार करता, त्या सर्वांना कायद्याचे कक्षेत नेण्यास कसल्याही प्रकारचा संकोच करणार नाही. त्यामुळे मी प्रत्यक्षात जे बोललो होतो, त्याची लिंक शेअर करत आहे.'' गडकरी यांनी आपल्या ट्विटसोबत ते संपूर्ण भाषणही शेअर केले आहे. जे काही भाग कापून व्हायरल केले जात आहे.