उत्तराखंड: ८वीतील तरूणीचा विनयभंग! अश्लील व्हिडीओ अन् भाजपा नेत्याच्या मुलीनं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 05:00 PM2024-02-14T17:00:44+5:302024-02-14T17:01:11+5:30

दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत होताना दिसत आहे.

BJP leader Savita Saxena's 13-year-old daughter committed suicide after being molested in Uttarakhand  | उत्तराखंड: ८वीतील तरूणीचा विनयभंग! अश्लील व्हिडीओ अन् भाजपा नेत्याच्या मुलीनं संपवलं जीवन

उत्तराखंड: ८वीतील तरूणीचा विनयभंग! अश्लील व्हिडीओ अन् भाजपा नेत्याच्या मुलीनं संपवलं जीवन

दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. उत्तराखंडमधीलभाजपा नेत्याच्या मुलीने छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. भाजपा नेत्याच्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एक तरूण अनेक दिवसांपासून इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीला त्रास देत होता. घटनेच्या दिवशीही त्याने घरात घुसून विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

स्थानिक सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन परिसरातील हायडल कॉलनीत राहणाऱ्या सविता सक्सेना या भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्सेना यांची मुलगी खुशी (१३) ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. पण, शाळेतून ये-जा करताना आरोपी खुशीला त्रास द्यायचा. 
 
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी 
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण विनयभंगाचे नसून प्रेमप्रकरण आहे. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. मृत खुशी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपीच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला मदत न करता मुलीचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर टाकले. मग पुन्हा तक्रार केल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी माफी मागून पोलिसांना सहकार्य केले. 

दरम्यान, आरोपी आपल्या मित्रांसह मुलीच्या घरात घुसल्याचा आरोप आहे. त्यावेळी पीडिता घरात एकटीच होती. आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतर आरोपीने अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली आणि तिथून पळ काढला. यामुळे पीडिता तणावात आली अन् तिने दुपारच्या सुमारास दुपट्ट्याने गळफास लावून घेतला.

Web Title: BJP leader Savita Saxena's 13-year-old daughter committed suicide after being molested in Uttarakhand 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.