Smriti Irani : "आता राहुल गांधींचं राजकारण बदललंय, ते..."; स्मृती इराणींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:27 AM2024-08-29T10:27:02+5:302024-08-29T10:46:51+5:30
Smriti Irani And Rahul Gandhi : भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. "आता राहुल गांधींचं राजकारण बदललं आहे. ते एक वेगळं राजकारण करत आहेत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण ही वेगळी गोष्ट आहे" असं स्मृती यांनी म्हटलं आहे.
स्मृती इराणी यांनी पत्रकारांच्या पॉडकास्ट टॉप अँगलमध्ये विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांना राहुल गांधींबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, राहुल गांधींच्या राजकारणात बदल झाला आहे. त्यांना यश मिळालं असं वाटतं.
"राहुल गांधी यांनी संसदेत टी-शर्ट घातला आहे. पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टने तरुण पिढीला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे, हे त्यांना माहीत आहे. आपण गैरसमजात राहू नये. त्यांनी उचललेलं पाऊल तुम्हाला योग्य वाटेल किंवा अयोग्य वाटेल पण ते वेगळं राजकारण करत आहेत."
स्मृती इराणी यांनी २०१९ मध्ये राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने २०२४ च्या निवडणुकीत या पराभवाचा बदला घेतला आणि स्मृती इराणी यांचा पराभव केला. अमेठीमध्ये किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे.