भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमाने हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या एका विधानानंतर अधिकारी यांनी ममतांवर हा निशाणा साधला. "तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता, हे सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ," असे ममतांनी सुवेंदू यांचा दावा फेटाळत म्हटले होते. यावर आता पुन्हा एकदा, "ही भीती मला चांगली वाटली, आपण त्यांनी (ममता बॅनर्जी) फोन कसा केला होता याचे पुरावेही देणार आहोत, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे."
भ्रष्टाचाराच्या पोळाची राणी मधमाशी -सुवेंदू अधिकारी म्हणाले, हे अत्यंत लज्जास्पद आहे की, आपण माझ्यासाठीही तोच "किंभूत किमाकर" शब्द वापरला, जो यापूर्वी पंतप्रधानांसाठीही वापरला होता. राहिला प्रश्न दिल्लीला फोन करण्याचा, तर आपण त्यासाठी लँडलाईन फोनचा वापर केला होता. आपण लवकरच हे एक्सपोज करू. माझ्या अचूक उत्तरासाठी उद्याची वाट बघा. एवढेच नाही, तर ममता यांना भ्रष्टाचाराच्या पोळाची राणी मधमाशी म्हणत, आपल्या सर्व आमदारांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होत आहे. आणि आपण त्यांचा बचाव करत आहात," असेही सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी सुवेंदू यांनी केला होता असा दावा - तत्पूर्वी, सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी दावा केला होता की, निवडणूक आयोगाने टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर, बॅनर्जी यांनी अमित शाह यांना फोन करून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यानी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधताना, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते (भाजप) 200 हून अधिक जागा जिंकू शकणार नाहीत, असे म्हटले होते.