बालूरघाट : पंचायतीमध्ये अविश्वास ठराव मंजूर करण्यात अपयश झाल्याचा राग आल्याने गटविकास अधिकाऱ्यावर एका भाजप नेत्याने चेंबरमध्ये घुसून खुर्च्या फेकल्याचा प्रकार दक्षिण दिनाजपूरमधील बालूरघाटमध्ये घडला. खुर्च्या फेकल्याने बीडीओ अनुज सिकदर यांच्या डोक्याला जखमा झाल्या. या घटनेनंतर पोलिसांनी भाजपचे मंडल सभापती सुभाष सरकार यांच्याविरोधात तपास सुरू केला आहे.
येथे भाजपने अविश्वास ठराव आणला होता. त्यामुळे बैठक बोलावण्यात आली होती, त्यात बीडीओ गेले नाहीत. त्यावरून वाद निर्माण झाला होता.
कारवाई करणारसरकार बीडीओ कार्यालयात पोहोचताच त्यांनी खुर्च्या उचलत बीडीओंच्या डोक्यात घातल्या. सरकार यांची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यांनी माझ्यावर हल्ला का केला, ते मला माहीत नाही. मी कायदेशीर कारवाई करेन, असे बीडीओंनी म्हटले आहे.