नवी दिल्ली:भाजपा नेत्या तसेच माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर त्या आज ऋषिकेश येथील AIIMS मध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी ट्विट करत याचे तीन कारण सांगितले आहेत. यांपैकी एकात, त्यांनी बाबरी मशीदप्रकरणी येणाऱ्या निकालासंदर्भात भाष्य केले आहे.
बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात 30 सप्टेंबरला सीबीआयचे विशेष न्यायालय निकाल देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी आहेत.
यासंदर्भात उमा भारती यांनी ट्विट करत म्हटले आहे, ''मी अत्ताच एम्स ऋषिकेशमध्ये भरती झाले आहे. याची तीन कारणे आहेत. (1) हर्षवर्धन जी प्रचंड चिंता करत होते. (2) माझा ताप रात्री वाढला. (3) एम्समध्ये माझी तपासणी झाल्यानंतर सकारात्मक अहवाल आला, तर परवा लखनौ येथील सीबीआय न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे.''
यापूर्वी उमा भारती यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विट केले होते, हिमायल यात्रा संपण्याच्या शेवटच्या दिवशी, मी प्रशासनाला आग्रह करून कोरोना टेस्टच्या टीमला बोलविले. कारण, मला ३ दिवस हलका ताप होता, असे उमा भारती यांनी ट्विट करत म्हटले होते. कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वत:च सांगितले.
SBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट
हिमालयात कोविड-19 चे सर्व नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. तरीही कोरोनाची लागण झाली. सध्या वंदे मातरम् कुंज याठिकाणी क्वारंटाइन आहे. येथे कुटुंबीयांसारखे आहे. 4 दिवसांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करेन आणि त्यानंतर डॉक्टरांचा सल्ल्याने निर्णय घेईन, असेही उमा भारती यांनी म्हटले होते. याचबरोबर, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही त्यांनी ट्विट करून केले होते.
आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट