'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलू नये'; उमा भारतींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 01:11 PM2021-10-05T13:11:27+5:302021-10-05T13:11:41+5:30

उमा भारतींनी प्रियंका गांधींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, काँग्रेसने लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे.

BJP leader Uma Bharti slams Priyanka Gandhi Vadra over lakhimpur khiri issue | 'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलू नये'; उमा भारतींची टीका

'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलू नये'; उमा भारतींची टीका

Next

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी प्रियांका गांधींवर पलटवार केला आहे. 'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार गमावला आहे', अशी टीका उमा भारती यांनी केली. तसेच, '1984 च्या दंगलीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी हजारो शिखांची हत्या केली होती,' असेही त्या म्हणाल्या.

उमा भारती यांनी ट्विटरवर लिहिले की, 'उत्तर प्रदेश प्रभारी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर काँग्रेस नेत्यांनी ज्या मुद्यांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही अशा मुद्द्यांवर बोलू नये. देशात आणीबाणी लादणाऱ्या पक्षाने लोकशाहीचा उच्चार करण्याचा अधिकार गमावला आहे. 1984 च्या दंगलीत, काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 10,000 शिखांची हत्या केली. त्यामुळे काँग्रेसच्या तोंडून अहिंसा हा शब्द शोभत नाही', असे त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधींचा निशाणा
लखीमपूर खrरी हिंसाचारप्रकरणी विरोधक राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. लखीमपूर खrरीला जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेल्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासोबतच प्रियंका गांधींनी हिंसाचाराशी संबंधित व्हायरल व्हिडिओबद्दल प्रश्न उपस्थित केला की, या व्यक्तीला अद्याप अटक का करण्यात आली नाही?'

Web Title: BJP leader Uma Bharti slams Priyanka Gandhi Vadra over lakhimpur khiri issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.