उत्तराखंड: पोलीस अन् गावकऱ्यांमध्ये तुफान राडा! भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:12 AM2022-10-13T00:12:40+5:302022-10-13T00:13:36+5:30

गोळीबारात ५ पोलीस अधिकारीही जखमी

BJP Leader wife shot dead in clash between UP Police, people of Uttarakhand's Bharatpur village five cops injured | उत्तराखंड: पोलीस अन् गावकऱ्यांमध्ये तुफान राडा! भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

उत्तराखंड: पोलीस अन् गावकऱ्यांमध्ये तुफान राडा! भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

Next

Woman shot dead in clash between UP Police and people: उत्तराखंडमध्ये, ५० हजारांचे इनाम असलेल्या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या उत्तर प्रदेश पोलिस दल आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत ब्लॉक प्रमुखाच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या चकमकीत SHO सह पाच पोलीस जखमी झाले आहेत. यातील दोन पोलिसांना गोळ्याही लागल्या आहेत.

नक्की कसा घडला प्रकार?

५० हजारांचे इनाम असलेल्या खाण माफियाला पकडण्यासाठी उत्तराखंडच्या काशीपूरच्या कुंडा गावात यूपी पोलीस त्याचा पाठलाग करत होते. खाण माफियाचा पाठलाग करताना माफिया जफरने उत्तराखंड सीमा ओलांडून जसपूरमध्ये प्रवेश केला. या दरम्यान जफर आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ब्लॉक प्रमुख गुरताज भुल्लर यांची पत्नी गुरप्रीत कौर यांना गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला.

महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला चढवला आणि त्यांना ओलीस ठेवले. पोलिसांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच मुरादाबाद रेंजचे DIG शलभ माथूर, SSP हेमंत कुतियाल, SPRA संदीप मीना घटनास्थळी पोहोचले. अनेक पोलिस ठाण्यांच्या पोलिस फौजफाट्याबरोबरच राखीव पोलीस दलही तेथे तैनात करण्यात आले. आता उत्तराखंडच्या जसपूरमध्ये हायवेवर धरणे धरणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस अधिकारी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपा ब्लॉकप्रमुखाच्या पत्नीचा मृत्यू

अहवालानुसार, खाण माफियांना पकडण्यासाठी पोलीस एका घरावर छापा टाकण्यासाठी आले होते, ज्याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नव्हती. छाप्यादरम्यान, पोलिस आणि जसपूर भाजपा ब्लॉक प्रमुख गुरताज भुल्लर यांच्या कुटुंबामध्ये झटापट झाली. त्यानंतर गोळीबार झाला आणि एक गोळी ब्लॉक प्रमुखाच्या पत्नीलाही लागली. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर गावकऱ्यांनी पोलीस पथकाला घेराव घातला आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी ४ जणांना पकडून कुंडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच वेळी या घटनेमुळे संतप्त रहिवाशांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

या घटनेबाबत मुरादाबादचे SSP म्हणाले की, आमच्या २ हवालदारांना गोळ्या लागल्या आहेत. तर SHO गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत उत्तराखंडचे पोलीस डीजीपी अशोक कुमार म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली आहे की जफर हा एक वाँटेड गुन्हेगार होता, यूपी पोलिस त्याचा पाठलाग करत होते आणि यादरम्यान गोळीबाराची घटना घडली. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत."

Web Title: BJP Leader wife shot dead in clash between UP Police, people of Uttarakhand's Bharatpur village five cops injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.