देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकांच्या आधी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची आणखी एक उमेदवार यादी जाहीर झाली आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली असून त्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपने बुधवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना ओडिशा आणि मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केले. हे दोघेही निवडून आले तर या दोन्ही राज्यांतील नेत्यांची ही दुसरी राज्यसभेची टर्म असेल हे जवळपास निश्चित आहे.
केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्याशिवाय भाजपने मध्य प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आणखी तीन नावांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री डॉ एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नरोलिया आणि बन्सीलाल गुर्जर हे मध्य प्रदेशमधून भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.
घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR
२०१९ मध्ये माजी आयएएस अधिकारी वैष्णव यांच्या पहिल्या टर्मसाठी निवडून आल्याप्रमाणे, राज्याच्या सत्ताधारी बिजू जनता दलाच्या पाठिंब्याने रेल्वेमंत्री वैष्णव निवडले जाण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे.
तर दुसरीकडे, महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेची उमेदवार देऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे.