BJP Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) भाजपने (BJP) काल(दि.2) 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यानंतर आता पक्षाने देणगी अभियानाला (Donation Campaign) सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपद्वारे (Namo APP) देणगीला सुरुवात केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नमो अॅपद्वारे देणगी अभिया सुरू केले आहे. याद्वारे भाजप समर्थक आपल्या मनाने पक्षाला देणगी देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नमो ॲपद्वारे त्यांच्या पक्षाला (भाजप) 2000 रुपयांची देणगी दिली. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करुन ही माहिती दिली आणि देणगी दिलेला स्क्रीनशॉटही शेअर केला.
या फोटोसोबत पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांना पैसे दान करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, 'मला पक्षासाठी योगदान देण्यात आनंद होत आहे. विकसित भारत घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या. नमो ॲपद्वारे देणगी देऊन भारताच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो.'
भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीरआगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि एनडीए 400 पार, हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपने आज 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात, ३४ केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री 2 माजी मुख्यमंत्री, 57 ओबीसी उमेदवार, 47 पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाचे, 28 महिला उमेदवार, 27 अनुसूचित जाती आणि 18 अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेच्या अन्य जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित होतील.