शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मिशन 2024! माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या 3 दिग्गज नेत्यांना BJP मध्ये मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 6:48 PM

2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी शिल्लक आहे, पण भाजपने तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून एक ते दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे, पण भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपने यापूर्वी काँग्रेसचा मोठा चेहरा असलेल्या अनेक नेत्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला आणि त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यातच छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी भाजपने अनेक बड्या चेहऱ्यांना पक्षात महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

जयवीर शिरगिल भाजपमध्येप्रत्येक आघाडीवर काँग्रेसची ढाल बनलेल्या जयवीर शेरगिल यांना भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते बनवून पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे. शेरगिल हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि तर्कशुद्ध संभाषणासाठी ओळखले जातात. शेरगिल यांनी तीन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

कॅप्टन यांचा पक्ष भाजपात विलीनकॅप्टन यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी संबंध तोडून पंजाब लोक काँग्रेस या नावाने पक्ष स्थापन केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी स्वतःची परंपरागत विधानसभेची जागाही गमावली. निवडणुकीतील पराभवानंतर काही महिन्यांनी कॅप्टन यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला होता. कॅप्टनच्या येण्याने भाजप शिखांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

सुनील जाखड भाजपातत्याचबरोबर पंजाबचे आणखी एक तगडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बलराव जाखड यांचे पुत्र सुनील जाखड हेदेखील भाजपला पंजाबमध्ये मजबूत करताना दिसणार आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि मे महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. आता पंजाबमध्ये जाखड यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला कितपत फायदा होईल हे पाहायचे आहे.

स्वतंत्रदेव सिंह यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी पक्षाच्या उत्तर प्रदेश युनिटचे माजी अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांचीही राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या उत्तराखंड युनिटचे प्रदेशाध्यक्ष असलेले मदन कौशिक यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य बनवण्यात आले आहे. यासोबतच छत्तीसगड भाजपचे माजी अध्यक्ष विष्णुदेव साई आणि पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष मनोरंजन कालिया, अमनजोत कौर रामुवालिया आणि एस. राणा गुरमीत सिंग सोढी यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक