शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

२०२६ मध्ये भाजपला राज्यसभेत बहुमत? २०२४-२६ मधील सर्व निवडणुका जिंकाव्या लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:31 IST

BJP News: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यसभेत भलेही कामापुरते बहुमत मिळाले आहे. पण, राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळविणे हे भाजपसाठी मृगजळ ठरत आहे. भाजपला राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील म्हणजे, २०२६ पर्यंतचा कालावधी लागेल. 

- हरीश गुप्ता नवी दिल्ली - भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यसभेत भलेही कामापुरते बहुमत मिळाले आहे. पण, राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळविणे हे भाजपसाठी मृगजळ ठरत आहे. भाजपला राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील म्हणजे, २०२६ पर्यंतचा कालावधी लागेल. 

सध्या राज्यसभेत भाजपचे ९६ सदस्य आहेत. जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीनंतर पक्षाची सदस्यसंख्या दोनने वाढू शकते. कारण, जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेचे ४ खासदार निवडून येतील. या सभागृहातील सदस्य संख्या वाढविण्यासाठी भाजपला २०२४-२६ या काळातील महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, बिहार  आणि दिल्ली या राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकाव्या लागतील. तामिळनाडूत २०२५ मध्ये सहा जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक  होणार आहे. मात्र, या राज्यात भाजपला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. आंध्रप्रदेशातील पोटनिवडणुकीनंतर भाजपचा आकडा एकने वाढू शकतो. सध्या राज्यसभेत २४५ पैकी २३७ सदस्य आहेत.

सध्या काय?- २०२६ मध्ये राज्यसभेच्या ७२ जागांसाठी निवडणुका होतील तेव्हा भाजपचे संख्याबळ वाढू शकेल. बहुसंख्य राज्यांत भाजप सत्तेत आहेत.- पण, स्वबळावर १२२ जागांसह बहुमत मिळवायचे असेल तर भाजपला सर्व राज्यातील निवडणुका जिंकाव्या लागतील.- एनडीए सत्तेत असलेल्या राज्यात छोट्या आणि प्रादेशिक पक्षाच्या खासदारांना त्या पक्षापासून फोडून नंतर पोटनिवडणुकीत त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणण्यात पक्षाला यश आले आहे.

हरयाणासाठी ६७ उमेदवारांची यादी जाहीरहरयाणा विधानसभेसाठी भाजपने ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना लाडवातून उमेदवारी दिली आहे.भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकर यांना बदलीमधून, दिग्गज नेते अनिल विज यांना अंबालामधून तिकिट दिले आहे.केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांची मुलगी आरती सिंह राव अटेलीमधून लढवणार आहेत. कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई, कॅप्टन अभिमन्यू, माजी खासदार सुनीता दुग्गल यांचीही नावे यादीत आहेत.शक्ती रानी शर्मा, ज्ञानचंद गुप्ता, राम कुमार गौतम, डॉ. कृष्ण लाल मिड्ढा, देवेंद्र अत्री, देवेंद्र सिंह बबली, डुडा राम बिश्नोई, राजिंदर देशुजोधा, श्रुती चौधरी, दीपक हुडा, मंजू हुडा, रेनू डाबला यांच्या नावांचाही समावेश आहे.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद