शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; 20 लाख रोजगार देण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:45 PM

BJP Manifesto : भाजपने गुजरातसाठी आपला जाहीरनामा (Manifesto) जारी केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप (BJP) कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी भाजपने देशातील आणि राज्य पातळीवरील सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे. दरम्यान, भाजपने गुजरातसाठी आपला जाहीरनामा (Manifesto) जारी केला आहे.

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. यावेळी गुजरात दिशा देणारी भूमिका आहे. गुजरात ही संतांची भूमी आहे. नव्या संकल्पाने गुजरातचा विकास होईल. भाजप सरकार जे सांगते तेच करते. आम्ही संविधानानुसार चालतो, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. भाजपच्या जाहीरनाम्यानुसार, गुजरातमधील तरुणांना पुढील 5 वर्षांत 20 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. 10,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 20,000 सरकारी शाळांचे रूपांतर उत्कृष्ट शाळांमध्ये केले जाईल. 

जाहीरनाम्यानुसार, 3 सिव्हिल मेडिसिटी, 2  एम्सच्या स्तरावरील संस्था स्थापन करण्यासाठी आणि सध्याची रुग्णालये,  सीएचसी आणि पीएचलीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 10,000 कोटी रुपये महाराजा श्री भागवत सिंह जी आरोग्य कोष तयार केले जाईल. तसेच, 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने, गुजरात ऑलिम्पिक मिशन सुरू होईल आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. गुजरातमधील प्रत्येक नागरिकाकडे पक्के घर असल्याची खात्री केली जाईल.

याचबरोबर, 1 लाखांहून अधिक महिलांना सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ महिला नागरिकांना मोफत बस प्रवासाची सुविधा मिळणार आहे. कामगारांना 2 लाख रुपयांपर्यंतचे असुरक्षित कर्ज देण्यासाठी कामगारांना क्रेडिट कार्ड दिले जातील. याशिवाय, गुजरात यूनिफॉर्म सिव्हिल कोड कमिटीच्या शिफारशी पूर्णतः लागू केला जाईल. अँटी-रॅडिकलायझेशन सेल तयार केला जाईल. गुजरात रिकव्हरी ऑफ डॅमेज ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट प्रॉपर्टी अॅक्ट लागू केला जाईल. साउथ ईस्टर्न पेरिफेरल हायवे आणि नॉर्थ वेस्टर्न पेरिफेरल हायवे बांधले जातील. यासह, संपूर्ण गुजरातला 4-6 लेन रस्त्यांनी जोडणारा 3,000 किमीचा पहिला परिक्रमा विकसित केला जाईल.

गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदानगुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर, काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातBJPभाजपा