शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

भाजपचा 'मेगा प्लॅन'! 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी 'या' पक्षांसोबत करणार युती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 1:59 PM

भाजपने नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP)सोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील (North East India) तीन राज्यांतील मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland) आणि त्रिपुरा (Tripura) या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रिंगणात उतरण्यापूर्वी भाजपने (BJP) खास रणनीती आखली आहे. भाजपने नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP)सोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

60 जागांच्या नागालँड विधानसभेत भाजप 20 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तर, नागालँडच्या उर्वरित 40 जागांवर एनडीपीपी, जे एनईडीएचा घटक म्हणजेच नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सच्या उमेदवारांना तिकीट मिळेल. मेघालय आणि त्रिपुरा निवडणुकीसाठी भाजपचीही खास योजना आहे.

मेघालयसाठी भाजपचा खास प्लॅनयावेळी भाजप मेघालयमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. येथील एनईडीएच्या घटक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने आधीच युतीशिवाय निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, 2018 च्या निवडणुकीनंतर मेघालयमध्ये 6 पक्षांची युती झाली होती, ज्याच्या मदतीने सरकार 5 वर्षे टिकले. या आघाडी सरकारमध्ये भाजपच्या दोन आमदारांचाही समावेश होता.

त्रिपुरामध्ये युती संदर्भात भाजपची चर्चादुसरीकडे, त्रिपुरामध्ये नवीन पार्टी टिप्रा मोथासोबत युती करण्याची भाजपची चर्चा सुरू आहे. पण टिप्रा मोथाचे नेते प्रद्युत देबबर्मा म्हणाले की, जर भाजप किंवा कोणत्याही राष्ट्रीय पार्टीने त्यांना टिप्रा मोथा लँडचे लेखी आश्वासन दिले तर ते त्या पार्टीशी युती करण्यास तयार आहेत.

हिमंता बिस्वा सरमा आणि प्रद्युत देबबर्मा यांच्यात बैठकविशेष म्हणजे या मुद्द्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि प्रद्युत देबबर्मा यांच्यात दिल्लीत बैठकही झाली आहे. टिप्रा मोथा यांना आधीच सीपीएमकडून युतीचा प्रस्ताव आला आहे, परंतु पक्षाचे नेते प्रद्युत देबबर्मा यांनी सीपीएमचा प्रस्ताव नाकारला आहे. दरम्यान, ईशान्य भारतात भाजप आपली पकड कायम ठेवण्यासाठी आणि विरोधकांचा पराभव करण्यासाठी जोरदार रणनीती आखत आहे. तिन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, तेथेही युतीबाबत चर्चा झाली आहे की, त्यावर चर्चा सुरू आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकTripuraत्रिपुरा