...तर पुढील वर्षीच मोदी सरकारला जोरदार धक्का; एक निवडणूक ठरणार हुकूमाचा एक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 06:40 PM2021-07-14T18:40:30+5:302021-07-14T18:41:24+5:30

विरोधकांचं बैठकांचं सत्र सुरू; निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर गांधी कुटुंबाच्या भेटीला; शरद पवारदेखील सक्रीय

bjp might loose presidential election if it suffers in uttar pradesh assembly election | ...तर पुढील वर्षीच मोदी सरकारला जोरदार धक्का; एक निवडणूक ठरणार हुकूमाचा एक्का

...तर पुढील वर्षीच मोदी सरकारला जोरदार धक्का; एक निवडणूक ठरणार हुकूमाचा एक्का

Next

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी भाजपला मोठा झटका देण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केल्याचं दिसत आहे. त्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कालच गांधी कुटुंबाची भेट घेतली. त्याआधी महिन्याभरात ते तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधकांचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली. मात्र खुद्द शरद पवारांनी आपण राष्ट्रपतीपदासाठी उत्सुक नसल्याचं सांगितलं आहे.

एखाद्या निवडणुकीत विजयी होण्याची खात्री नसेल तर ती निवडणूक शरद पवार लढत नाहीत, असं म्हटलं जातं. त्यामुळेच राष्ट्रपतीपदाची निवडणूक विरोधकांसाठी अधिक आव्हानात्मक असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमदार, खासदारांची मतं विचारात घेतली जातात. त्यातही प्रत्येक राज्यातील आमदार, खासदारांच्या मतांचं मूल्य वेगळं असतं. हे मूल्य लोकसंख्येनुसार ठरतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का द्यायचं असल्यास उत्तर प्रदेशची निवडणूक हुकूमाचा एक्का ठरू शकते.

राष्ट्रपती पदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान; प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दलही स्पष्टच बोलले

मतांचं गणित नेमकं काय?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण १० लाख ९८ हजार ९०३ मतं आहेत. निवडणूक जिंकण्यासाठीचा जादुई आकडा ५ लाख ४९ हजार ४५२ इतका आहे. सध्या भाजपकडे ४ लाख ७४ हजार मतं आहेत. उर्वरित मतांसाठी भाजपला मित्रपक्षांची गरज लागेल. त्यासाठी बिजू जनता दल, एआयडीएमके, टीआरएस, वायएसआर काँग्रेस भाजपला मदत करू शकतात. तशी मदत या पक्षांनी याआधी मोदी सरकारला केली आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणूक चित्र बदलणार?
२०२२ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होईल. गेल्या निवडणुकीत भाजपनं राज्यात तीनशेहून अधिक जागा जिंकल्या. पुढील वर्षी निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक असेल. लोकसंख्या जास्त असल्यानं उत्तर प्रदेशातील आमदारांचं मूल्य अधिक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला नुकसान सहन करावं लागल्यास त्याचा परिणाम राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिसेल.

शिवसेना आणि मित्रपक्षांची साथ सोडल्याचा काय परिणाम?
शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या दोन जुन्या मित्रपक्षांनी भाजपची साथ सोडली आहे. गेल्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष भाजपसोबत होते. २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना ६५ टक्के मतं मिळाली. यातील ४० टक्के मतं भाजपची होती. शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांची संख्या लक्षात घेता निवडणुकीतील त्यांच्या मतांचा प्रभाव दोन ते अडीच टक्क्यांच्या आसपास आहे. अकाली दलाचीही स्थिती सारखीच आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

Web Title: bjp might loose presidential election if it suffers in uttar pradesh assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.