भाजपच्या मंत्र्यांनी नाेएडा म्हणून बीजिंग विमानतळाचे फाेटाे केले शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 06:26 AM2021-11-28T06:26:50+5:302021-11-28T06:27:19+5:30

Politics News: पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उत्तर प्रदेशात जेवर येथे नाेएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. आशियातील हे सर्वात माेठे विमानतळ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

BJP ministers share Beijing airport as Naida | भाजपच्या मंत्र्यांनी नाेएडा म्हणून बीजिंग विमानतळाचे फाेटाे केले शेअर 

भाजपच्या मंत्र्यांनी नाेएडा म्हणून बीजिंग विमानतळाचे फाेटाे केले शेअर 

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उत्तर प्रदेशात जेवर येथे नाेएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. आशियातील हे सर्वात माेठे विमानतळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या विमानतळाचे काही संभाव्य फाेटाे भाजपचे मंत्री आणि नेत्यांकडून शेअर करण्यात आले. ते फाेटाे चक्क चीनमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे असून, या प्रकारावरून जाेरदार टीका करण्यात येत आहे.

भाजपचे नेते, मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद माैर्य यांनीही ट्विटरवरून नाेएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संदर्भ देऊन फाेटाे शेअर केले आहेत. मात्र,  हे फाेटाे बीजिंगच्या दॅक्सिन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. चीनचे पत्रकार शेन शिवेई यांनीही हाच दावा केला आहे.

पायाभरणी समारंभातही बीजिंगच्या विमानतळाचेच फाेटाे वापरल्याबाबत शिवेई यांनी ट्विट केले आहे. भारतातील अधिकाऱ्याची अशी कृती अतिशय धक्कादायक असल्याचे शिवेई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काही फॅक्टचेक करणाऱ्या वेबसाईट्सनी देखील हा फाेटाे दॅक्सिन विमानतळाचाच असल्याचे म्हटले आहे. 

काँग्रेसने केली टीका
- शिवेई याच्या ट्वीटचा स्क्रीनशाॅट शेअर करून काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे. ही किती लाजिरवाणी गाेष्ट आहे. 
- मंत्र्यांना किती ज्ञान आहे, हे आपण जाणताेच. पण मायगव्हहिंदी या सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरूनही हेच फाेटाे शेअर करण्यात आले आहेत, असे ट्वीट किर्ती आझाद यांनी केले आहे.

Web Title: BJP ministers share Beijing airport as Naida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.