शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:24 AM

भाजपाचा आमदार कुलदीप सेनगर याला उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी पहाटे सीबीआयने ताब्यात घेतले. पहाटे साडे चार वाजता त्याच्या घरी सीबीआयचे अधिकारी गेले आणि त्याला ताब्यात घेतले, तेव्हा घरातील मंडळीनी प्रचंड गोंधळ घातला.

लखनऊ : भाजपाचा आमदार कुलदीप सेनगर याला उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी पहाटे सीबीआयने ताब्यात घेतले. पहाटे साडे चार वाजता त्याच्या घरी सीबीआयचे अधिकारी गेले आणि त्याला ताब्यात घेतले, तेव्हा घरातील मंडळीनी प्रचंड गोंधळ घातला. या बलात्कार प्रकरणाचा तपास कालच सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र अटक केली नव्हती. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आमदार सेनगरला ताबडतोब अटक करा, असे आदेश दिले.आ. सेनगर याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अपहरण व तिच्या वडिलांच्या मारहाणीचा कट याबद्दलची कलमे लावून एफआयआर दाखल करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आ. सेनगरला अटक करण्यास मात्र टाळाटाळ चालवली होती. त्याला ताब्यात घेतल्याबद्दल बलात्कार झालेली मुलगी व तिच्या आईने समाधान व्यक्त करतानाच, त्याला अतिशय कडक शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी केली.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय तपास व आ. सेनगरला ताब्यात घेतल्याचे सारे श्रेय आपल्या सरकारचे असल्याचा दावा केला आहे. व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्यावर कायद्यानुसारच कारवाई होईल, असे ते म्हणाले.आ. सेनगर व त्याच्या भावाने जून २०१७मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. तपास योग्य पद्धतीने होत नसल्याबद्दल तिने ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी त्या मुलीचे वडील पप्पू सिंग यांना अटक केली. दुसºया दिवशी वडिलांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. सिंग यांना पोलीस कोठडीमध्ये आमदारांच्या चार साथीदार आणि पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम अहवालात त्यांना झालेल्या मारहाणीचा उल्लेख होता. तसेच त्यांनीही मृत्यूआधी आपणास कोणी मारहाण केली, हे सांगितले होते. (वृत्तसंस्था)>तपासाचा अहवाल द्याआमदाराला ताब्यात घेतले आहे, पण अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात देताच मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले व न्या. सुनीत कुमार यांच्या खंडपीठाने सीबीआयला अटकेचे आदेश दिले.या प्रकरणातील तपासाची माहिती न्यायालयाला देण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगर