जिंद: हरियाणा राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. याच सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने सरकारी अधिकाऱ्यांबद्दल एक वादग्रस्त वक्तवंय केलं आहे. हरियाणातील जिंदमधील भाजप आमदार डॉ.कृष्ण मिध्दा यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबद्दल टिप्पणी करताना, अधिकाऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत केली आहे.
पाहणी करण्यासाठी आले होते आमदार
भाजप आमदार मिद्धा आपल्या मतदारसंघात पावसानंतर उद्धभवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी नागरिकांनी त्यांना परिसरातील एक रस्ता पावसात वाहून गेल्याची माहिती दिली. त्यानंतर आमदारांनी तात्कळ अधिकाऱ्यांना बोलावले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आले होते. त्यांना आमदारांनी प्रश्न विचारला असता, अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली.
अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजीअधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे आमदार नाराज झाले आणि अधिकाऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत केली. 'अधिकाऱ्यांपेक्षा दहशतवादी बरे. बॉम्बस्फोट करतात आणि त्याची जबाबदारी स्विकारतात. हे अधिकारी दहशतवाद्यांपेक्षाही गेलेले आहेत,'अशी टीका केली. तसेच, नागरिकांना येत्या काही दिवसात रस्ता ठीक करण्याचे आश्वासनही दिले.