लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) -गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी त्यांचे स्वपक्षीय आमदार डोकेदुखी ठरत आहेत. बलिया येथील गोळीबारकांडातील आरोपीचा आमदार सुरेंद्र सिंह यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता अजून एका आमदाराने योगी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील मोहम्मदी पोलीस ठाण्यात काल रात्री भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गोंधळ घातला. थेट पोलीस ठाण्यात घुसून गुंडगिरी करणाऱ्या आमदारांनी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीला आपल्यासोबत सोडवून नेले.मोहम्मदी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर संतप्त झाले. तसेच आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्रभर गोंधळ घातला.या दरम्यान, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत गैरवर्तन केले आणि पकडण्यात आलेल्या आरोपीला सोडवून आपल्यासोबत नेले. आता या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.दरम्यान, भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर यांनी दबंगगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. काही दिवसांपूर्वी लोकेंद्र बहादूर यांनी धान खरेदी केंद्रात जाऊन गोंधळ घातला होता. तसेच सरकारी धान खरेदी केंद्रात असलेले रजिस्टर फेकून दिले होते. तसेच धान खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांना शिविगाळही केली होती.
भाजपा आमदाराची पोलीस ठाण्यात गुंडगिरी, तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीला नेले सोडवून
By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 3:02 PM
BJP MLA News : थेट पोलीस ठाण्यात घुसून गुंडगिरी करणाऱ्या आमदारांनी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीला आपल्यासोबत सोडवून नेले
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील मोहम्मदी पोलीस ठाण्यात काल रात्री भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गोंधळपोलीस ठाण्यात घुसून गुंडगिरी करणाऱ्या आमदारांनी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीला आपल्यासोबत सोडवून नेलेमोहम्मदी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक केली होती