बंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेतील भाजपा आमदार महंतेश कवठगीमठ यांनी सरकारी अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या व्हॉटस् अॅप गु्रपवर अश्लील छायाचित्रे टाकून नसती आफत ओढवून घेत आंबटशौकीन असल्याचा परिचय दिला. बेळगावी मीडिया फोेर्स या व्हॉटस् अॅप ग्रुपवर ही अत्यंत आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याची गल्लत लक्षात आल्यानंतर विधान परिषदेतील भाजपचे सदस्य महंतेश कवठगीमठ यांनी माफी मागत हा प्रकार मुद्दाम केला नसल्याचा खुलासा करीत सारवासारवही केली.फोन बंद करताना तो काही वेळ निष्क्रिय झाला होता. अशात चुकून ही छायाचित्रे टाकली गेली. त्यावेळी मी विमानातून प्रवास करीत होतो. मी हा प्रकार हेतुत: केलेला नाही. असली छायाचित्रे व्हॉटस् अॅप ग्रुपवर मी कशी टाकीन? घडल्या प्रकारबद्दल माफी मागतो, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मी माफी मागितली असल्याने राजकीय उलथापालथ होणार नाही, असे कवठगीमठ म्हणाले.दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबद्दल मला काहीही माहिती नाही, असे सांगत भाजपा आमदाराच्या या निंदनीय भानगडीवर अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले.तथापि, या प्रकरणी कोणाचीही तक्रार न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. याच ग्रुपवर यापूर्वीही अशीच भानगड करणाऱ्याविरुद्ध आयटी कायद्यातील कलम ६६ आणि ६७ अन्वये कारवाई करण्यात आली होती.या प्रकरणावर दिल्लीहून बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते ब्रिजेश कलाप्पा म्हणाले की, महंतेश कवठगीमठ यांनी हा प्रकार हेतुपूर्वक केलेला नसावा. तथापि, सार्वजनिक ठिकाणी अश्लील छायाचित्रे वा साहित्य पाहणे हे भाजप नेत्यांच्या डीएनएतच आहे.टिष्ट्वटरवर टीका ही भारतीय संस्कृती आहे? उत्तर प्रदेशातील सडक सख्याहरींविरोधातील पथकांचे (अँटी रोमियो स्क्वाडस्) याबद्दल काय म्हणणे आहे? - आदितीयात बे्रकिंग न्यूज सांगण्यासारखे काय आहे? - मीरा मोहंती, मन की बात - प्रकाशया लोकांना दुसरे काही काम नाही. सत्ता आणि अधिकार यातून हे सगळे होत आहे.- विजय कुमार
भाजपाच्या आमदाराने व्हॉटस् अॅप ग्रुपवर टाकली अश्लील चित्रे
By admin | Published: May 04, 2017 3:48 AM