अरे देवा! भाजपा आमदार थेट गाय घेऊन पोहोचले विधानसभेत; पुढे झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 02:27 PM2022-09-20T14:27:04+5:302022-09-20T14:37:38+5:30

आमदार रावत यांनी थेट गायीसह प्रवेश केला. मात्र, विधानसभेत पोहोचण्यापूर्वीच रावत मीडियाशी बोलण्यासाठी थांबले. त्यानंतर गाय अचानक बिथरली आणि तेथून पळू लागली. 

bjp mla suresh singh rawat arrived in rajasthan assembly with cow | अरे देवा! भाजपा आमदार थेट गाय घेऊन पोहोचले विधानसभेत; पुढे झालं असं काही...

फोटो - NBT

Next

राजस्थान विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यात सहभागी होण्यासाठी पुष्करचे आमदार सुरेश सिंह रावत हे थेट एका गायीसह पोहोचले. मात्र याच दरम्यान असे काही घडले ज्यामुळे त्यांचीच काहीशी फजिती झाली आणि त्रासाला सामोरे जावे लागले. आमदार रावत यांनी थेट गायीसह प्रवेश केला. मात्र, विधानसभेत पोहोचण्यापूर्वीच रावत मीडियाशी बोलण्यासाठी थांबले. त्यानंतर गाय अचानक बिथरली आणि तेथून पळू लागली. 

गाय अचानक निघून गेल्याने आमदार पाहतच राहिले. गाय पळू लागल्याने विधानसभेच्या रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. यानंतर आमदार रावत यांना घेराव घालत काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला गायीच्या नावावर राजकारण करायचे होते, मात्र गोमातेनेच त्यांच्या नौटंकीचा अंत केला, अशी टीका काँग्रेसने केली. सोशल मीडियावरही या घडामोडींची जोरदार चर्चा होत आहे.

रावत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गोमाता गेल्या तीन महिन्यांपासून लंपीच्या आजाराने त्रस्त आहे. मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना त्याचा त्रास होत आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण गाय घेऊन विधानभवनात पोहोचलो. सरकारने गायींची काळजी घेणे आवश्यक आहे. याआधीही रावत यांनी अशाच प्रकारे वेगळ्याच पद्धतीने वेळोवेळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bjp mla suresh singh rawat arrived in rajasthan assembly with cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.